प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळ्याला नुकतीच भारताच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराज महाकुंभमध्ये पवित्र संगमावर स्नान करत संपूर्ण जगाला एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
आधी राष्ट्रपतींनी त्रिवेणी संगमावर फुले आणि नारळ अर्पण केले आणि भगवान सूर्याला अर्घ्य देऊन दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी संगमात डुबकी मारली. यानंतर वैदिक मंत्र आणि श्लोकांच्या पठणादरम्यान त्यांनी संगमास्थळी प्रार्थना केली आणि संगमाची आरतीही केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही इथं उपस्थित होते.
संगमावर उतरण्यापूर्वी, राष्ट्रपतींनी प्रथम पूर्ण श्रद्धेने पाण्याला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला आणि नंतर पवित्र संगमाला पुष्पहार आणि नारळ अर्पण केले आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाची प्रार्थना केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
स्नान केल्यानंतर त्यांनी पूर्ण धार्मिक पद्धतीने प्रार्थना केली. राष्ट्रपतींनी वैदिक मंत्र आणि श्लोकांमध्ये संगम त्रिवेणीचा दुधाभिषेक केला. यानंतर अक्षदा, नैवेद्य, फुले, फळे आणि लाल चुनरी अर्पण करण्यात केली व पवित्र संगमाची आरतीही केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सोमवारी सकाळी प्रयागराज येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
#WATCH | Prayagraj, UP: President Droupadi Murmu, Uttar Pradesh Governor Anandiben Patel, and UP CM Yogi Adityanath arrive at Triveni Sangam.
President Droupadi Murmu will soon take a holy dip at Sangam pic.twitter.com/WYepcGDUiy
— ANI (@ANI) February 10, 2025
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 5 फेब्रुवारी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. भगवे रंगाचे कपडे परिधान करून, हातात रुद्राक्षांची माळ घेऊन पंतप्रधान मोदींनी स्नान पवित्र स्नान केले होते.
दरम्यान, मौनी अमावास्यानंतर पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे. रस्त्यांपासून रेल्वे स्थानकांपर्यंत बरीच गर्दी आहे. शहराबाहेर आणि बाहेरील अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. अशास्थितीत येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.