“जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीला नवीन सुविधा देत होते, तेव्हा केजरीवाल सरकार एकामागून एक घोटाळे करत होते. दारू, बस खरेदी, वर्गखरेदी, पाणी मंडळ घोटाळा असे अनेक घोटाळे झाले. यामुळे दिल्लीतील विकासकाम ठप्प झाले, अशा शब्दात दिल्लीच्या नवनिर्वाचित भाजप सरकारमधील पीडब्ल्यूडी मंत्री प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. ते आज पत्रकारांशी बोलत होतें.
वर्मा पुढे म्हणाले की, आता दिल्लीत कायमस्वरूपी सरकार आले आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाची हमी आहे. तसेच आमच्या भाजप सरकारचे उद्दिष्ट केवळ सरकार चालवणे नाही तर दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवणे आहे. आमचे सरकार प्रत्येक दिल्लीकरांच्या पाठीशी उभे आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कामे वेगाने करू आणि सरकार खरोखर कसे काम करते हे जनतेला कळेल.तसेच दिल्लीत सध्या भाजपचे ४८ आमदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीत विकासाची एक नवी रेषा आखण्याचे तयारीत आहेत. त्यामुळे आता दिल्लीत यू-टर्न राहणार नाही, खड्डे राहणार नाहीत. विकास फक्त वेगाने होईल. असेही ते पुढे म्हणाले.
सोबतच ते म्हणाले की “मी दिल्लीतील लोकांना आश्वासन देतो की भाजप सरकार दिल्लीला विकासाच्या द्रुतगती मार्गावर घेऊन जाईल, जिथे फक्त प्रगती असेल. हा एक्सप्रेसवे कोणत्याही अडथळ्याशिवाय असेल. कोणत्याही अडथळ्यांशिवाय पुढे जाईल. त्याची दिशा फक्त जलद वाढीकडे वळेल. त्याचबरोबर दिल्लीतील लाखो लोक अनधिकृत वसाहतींमध्ये राहतात, जिथे वीज, पाणी, गटार आणि पक्के रस्ते यासारख्या सुविधांचा नेहमीच अभाव असतो. प्रवेश वर्मा म्हणाले की, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या सरकारने हा प्रश्न बराच काळ लटकवून ठेवला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम उदय योजने’ अंतर्गत केवळ एका झटक्यात ही समस्या सोडवली.
दरम्यान ते असही म्हणाले, की पूर्वी, या वसाहतींमधील लोकांच्या डोक्यावर अनिश्चिततेची तलवार लटकत होती. त्यांना नेहमीच भीती वाटत होती की त्यांना कधीही काढून टाकले जाऊ शकते, परंतु पंतप्रधान मोदींनी सर्वांना मालकी हक्क देऊन ही चिंता कायमची संपवली आहे.त्यामुळे आता दिल्ली विकासाच्या दिशेने सुसाट सुटतेय.
एकंदरीत दिल्लीत भाजपचे नवीन सरकार आल्यानंतर दिल्लीतील वातावरण हे भाजपमय झालं आहे आणि तिथली परिस्थिती देखील प्रचंड वेगाने बदलण्याचे चिन्ह आहेत.