तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा निषेध केला जात आहे. नुकतेच तामिनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्रावर हिंदी भाषा जबरदस्तीने लादल्याचा आरोप केला आहे. यावरच आता अमित शहांनी तामिळनाडू सरकाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
तामिळ सरकारने आधी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम तमिळ भाषेत सुरू करावा. असं म्हणत अमित शहांनी एमके स्टॅलिन यांना आरसा दाखवला आहे.
पुढे अमित शाह म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी सरकारने प्रादेशिक भाषांना महत्व देत भरती धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. आतापर्यंत सीएफपीएस (CAPF) भरतीमध्ये मातृभाषेला स्थान नव्हते. मात्र, पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला की आमचे तरुण आता तामिळसह आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये सीएफपीएस परीक्षेला बसू शकतील.’ हे काम मोदी सरकराने केले आहे.
‘मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना तामिळ भाषेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन करू इच्छितो.’ असं म्हणत अमित शहांनी एमके स्टॅलिन यांना भाषा वादावर चांगलेच घेरले आहे.
एमके स्टॅलिन हे तामिळनाडूमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या विरोधात आहेत. केंद्र सरकार एनईपीच्या (National Education Policy) माध्यमातून हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी तामिळनाडूच्या भाषिक अस्मितेला धोका असल्याचे म्हटले.
स्टॅलिन यांनी नुकतंच केंद्र सरकारला तमिळला अधिकृत भाषा बनवण्याचे, हिंदी लादणे थांबवण्याचे आणि तमिळनाडूच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते. त्यांनंतर आता अमित शाह यांनी स्टॅलिन यांना उत्तर दिलं आहे.