काँग्रेसचे जेष्ठ नेते मनी शंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सध्या चर्चेत आले आहेत. राजीव गांधी हे आपल्या महाविद्यालयीन जीवनात फेल झाले असल्याचे वक्तव्य त्यांनी एक मुलाखतीत केलं आहे.
राजीव गांधी हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दोनदा नापास झाले होते. मी त्यांच्यासोबत केम्ब्रीज मध्ये शिकत होतो ते तिथेही नापास झाले. जिथे पास होणे सोपे मानले जात होते. त्यानंतर त्यांनी लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण तिथेही ते नापास झाले त्यामुळे असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो असा प्रश्न मला पडला असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता स्वताच्याच पक्षातील लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मणिशंकर यांचे राजीव गांधी यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. असं म्हंटल आहे. तसेच कोण कोणत्या कोलेजमध्ये नापास पास झाले याचा पंतप्रधान किवा मंत्री होण्याशी काय संबंध? असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.
अशी बेजबाबदार विधाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात असून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी आहेत, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.
अशोक गेहलोत म्हणाले आहेत की, ‘राजीव गांधी पंतप्रधान असताना मी मणिशंकर अय्यर यांना भेटलो होतो, मणिशंकर अय्यर गेल्या 8-10 वर्षांपासून अशी वक्तव्ये करत आहेत, त्यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधाने केली होती, त्यानंतरही ते वादात आले होते. त्यांची अशी वादग्रस्त विधाने सातत्याने समोर येत आहेत. केवळ डोक्यानी कमी असणारी लोकचं असं बोलू शकतात जे पूर्णपणे समजण्यापलीकडचे आहे. असंही गेहलोत यांनी यावेळी म्हंटल आहे.