काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IAS अधिकारी संजय सेठी यांची MSRTC अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यासंबंधित एक आदेश पत्रही सादर करण्यात आले होते. अशातच आता मोठी बातमी समोर येत आहे. MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांकडे आलं आहे. सरनाईकांच्या नियुक्ती पत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी जेव्हा MSRTC च्या अध्यक्षपदी संजय सेठी यांची नियुक्ती केल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण होत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता सरनाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने या दोन्ही पक्षात अंतर आल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
2014 पासून एसटी महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच होते. मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटातील मंत्रिपदाची नाराजी दूर करण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांना देण्यात आलं होत. दरम्यान, भरत गोगावल्यांकडे आता रोजगार हमी विभागाचे मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांना देण्यात आलं आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाला दररोज कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असलायचं नुकतंच प्रताप सरनाईक यांनी म्हंटल होत. एसटी महामंडळाकडून, देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हंटल होतं. महामंडळाला दरदिवशी तब्बल 3 कोटी रुपये तोटा होत असल्याचं त्यांनी सांगितलं होत. त्यामुळे एसटी महामंडळाची सवलत बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होत. मात्र, प्रताप सरनाईकांनी यावर उत्तर देत कोणत्या सेवा बंद होणार नाहीत अशी ग्वाही दिली होती.