आज महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, ‘महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या स्त्री शक्तीला सलाम करतो. आमच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच काम केले आहे.जे आमच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येते.’ अशी पोस्ट मोदींनी शेअर केली आहे.
तसेच आजच्या या खास दिवशी मोदींनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. याबद्दलही त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांनी त्यांचे सहाही सोशल मीडिया अकाउंट्स महिलांच्या हाती सोपवले आहेत. मोदींच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलण्याची संधी मिळाली आहे.
तसेच महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संरक्षण फक्त महिला पोलीसच करतील. म्हणजेच पीएम मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांच्या हाती असेल. देशात पहिल्यांदाच असे घडणार आहे. जेव्हा महिला पोलिस पीएम मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील. गुजरातच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरात पोलिसांनी एक अनोखा पुढाकार घेतला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा महिला पोलिसांच्या हाती असणार आहे. पीएम मोदींच्या गुजरातमधील नवसारी शहरात येण्यापासून ते कार्यक्रमाच्या सुरक्षेपर्यंतची जबाबदारी फक्त महिला पोलिसांवर असेल. अशी माहिती देण्यात आली आहे.
पीएम मोदी आज नवसारी, गुजरातमध्ये लखपती दीदींच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. गुजरातपूर्वी पंतप्रधान मोदी दादरा-नगर हवेली, दमन आणि दीवलाही भेट देणार आहेत. अशा परिस्थितीत महिला दिनानिमित्त गुजरात पोलिसांनी विशेष पुढाकार घेत पीएम मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपवली आहे. म्हणजेच पंतप्रधान मोदी हेलिपॅडवर उतरल्यापासून ते सार्वजनिक सभेच्या ठिकाणी जाईपर्यंत सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांवर असेल. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी एकूण 2,145 महिला कॉन्स्टेबल, 61 इन्स्पेक्टर, 197 पीएसआय, 19 डीवायएसपी, 5 एसपी आणि एक डीआयजी दर्जा असलेली महिला अधिकारी तैनात करण्यात आली आहे.