गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. वलसाड जिल्ह्यातील वापी भागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीत 15 हून अधिक भंगाराची दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले .
याआधीही गुजरातमधील अनेक भागात आगीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यात गांधीधाम आणि गोध्रा येथे जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. अलीकडेच, 4 मार्च रोजी गोध्रा रेल्वे स्थानकाजवळील एका जुन्या इमारतीत भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप वेळ लागला होता.
#WATCH | गुजरात | वलसाड जिले के वापी इलाके में आग लगी। आग में 15 से ज़्यादा कबाड़ के गोदाम जल गए। दमकल की 10 गाड़ियां मौके पर मौजूद हैं। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/FppePiRVAO
— ANI_HindiNews (@AHindinews) March 8, 2025
वरील आगीबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वापी येथील आग इतकी भीषण होती की, अग्निशमन विभागाला तातडीने १० गाड्या घटनास्थळी पाठवाव्या लागल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सतत प्रयत्न करत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरातमध्ये अलीकडच्या काळात आगीच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे. 4 मार्च रोजी गोध्रा रेल्वे स्थानकाजवळील एका जुन्या इमारतीत पहाटे 1 वाजता आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, त्यात चार दुकाने आणि 5 ते 6 घरे जळून खाक झाली होती.