उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभात आत्तापर्यंत कोटीच्या संख्येने भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. महाकुंभ सोहळा 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. या महाकुंभात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. महाकुंभाचे हे यश पाहून अनेकजण याचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काहीजण टीका करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाकुंभावर भाष्य केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘गंगेच्या पाण्याला ना स्पर्श करू शकतो ना पिऊ शकतो. करोडोंच्या संख्यने लोकांनी यात स्नान केल्यानंतर ते पाणी स्वच्छ होऊ शकत नाही.’ असं वक्तव्य ठाकरेंनी केलं आहे.
पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘एवढ्या लोकांनी गंगेच्या पाण्यात आंघोळ केली असेल तर हे पाणी स्वच्छ असू शकत नाही. मला एका नेत्याने गंगाजल आणून दिले. मी ते पाणी पिण्यास स्पष्ट नकार दिला. ज्या गंगेच्या पाण्यात शेकडो लोक स्नान करतात ते पाणी स्वच्छ असू शकत नाही.’
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हंटल आहे की, ‘जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदू आणि सनातनींनी महाकुंभात पवित्र स्नान केले. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे. राज ठाकरे हे त्यांच्या भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहेत.’
दुसरीकडे उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे नेते आनंद यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाकुंभावर करोडो लोकांचा विश्वास आहे. तिथे लोकांना धर्म आणि श्रद्धेची अनुभूती आली. आता राज ठाकरेंना गंगा नदीचे पाणी प्रदूषित वाटत आहे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांना इतरांच्या भावनांचा आदर करता येत नसेल तर किमान महाकुंभावर श्रद्धा असलेल्यांचा अपमान तरी करू नये.’
दुसरीकडे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी देखील राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘ठाकरे यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु ते गंगेत डुबकी घेऊ इच्छिणाऱ्या लाखो लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.’ पुढे ते म्हणाले, ‘हा विशाल मेळावा आयोजित करणे हे धर्मग्रंथांवर आधारित असून ते वैज्ञानिकही आहे. ही लाखो लोकांची श्रद्धा आहे. अस म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिल आहे.