इस्राईलने गाझा पट्टीचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित केला असून, त्यामुळे तेथील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. इस्राईली बंधकांची तात्काळ सुटका करण्यासाठी इस्राईलने हमासवर दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी चर्चा सुरू करण्यावर जोर दिला जात आहे. हमासने अधिक कठीण अटींसह पुढील वाटाघाटी करण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, इस्रायलने प्रतिउत्तर म्हणून गाझाचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.
इस्राईल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्याची मुदत 1 मार्च रोजी संपली आणि दोन्ही बाजूंनी पूर्ण-प्रमाणावरील युद्धाकडे परत जाणे टाळले आहे. पण रविवारपासून काही प्रमाणात हवाई हल्ल्यासह अनियमित हल्ले सुरूच आहेत.
यासंबंधित माहिती देताना इस्राईलचे ऊर्जा मंत्री एली कोहेन यांनी एका निवेदनात म्हटले आहेत की, “मी नुकतेच गाझा पट्टीला वीजपुरवठा खंडित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ओलिसांना परत आणण्यासाठी आणि गाझामधून हमासला संपवण्यासाठी आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा वापर करणार आहोत.”
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला होता की, ‘जर हमासने इस्राईलमधील बंदिस्त लोकांना सोडले नाही तर इस्राईल आपले सर्व प्रयत्न करेन.’