Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

अजित पवारांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; कोणत्या घोषणा करण्यात आल्या? वाचा…

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 10, 2025, 04:58 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. लाडक्या बहिणी मिळाल्या म्हणून धन्य झालो, कोटी बारा प्रिय जणांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो…! असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. सादर केला.

या अर्थसंकल्पातून अजित पवारांनी राज्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडक्या बहिणींपासून ते शेतकऱ्यांपर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासा देणाऱ्या अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्द्यांवर एक नजर टाकूयात…

>’सन 2025-26 मध्ये लाडकी बहीण योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

>2027 मध्ये नाशिकमध्ये आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

>दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

>आग्रा येथे शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे. तसेच पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी जाणार आहे. संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांच्या खुणा आहेत, येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. तसेच हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचं यथायोग्य स्मारक उभारले जाणार आहे असंही अजित पवारांनी सांगितले.

>राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यात अमरावतीतील दर्यापूर, पुण्यातील पौड, इंदापूर व जुन्नर, छत्रपती संभाजीनगरमधील पैठण व गंगापूर, वर्ध्यातील आर्वी, नागपुरमधील काटोल, यवतमाळमधील वणी, धारशिवमधील तुळजापूर आणि हिंगोली येथील न्यायालयांचा समावेश असणार आहे.

>राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीसुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

>एक तालुका-एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही, तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे.

>आगामी काळात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांतील 7 हजार 201 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेण्यासाठी AI ची मदत केली जाणार आहे.

>मुंबई, पुणे, नागपूर या महानगरातील प्रवाशांना वातानुकुलित प्रवासाची सुविधा देण्यासाठी मुंबई-पुण्यात 64 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार आहेत. तसेच येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत. नागपूर मेट्रोचा पहिला 40 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

>अर्थमंत्री अजित पवारांनी राज्यातील औद्योगिक वीज दर कमी होणार असल्याचे म्हटले आहे. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या काळात ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे वीज खरेदी खर्चामध्ये 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे त्यामुळे औद्योगिक वीज दरात कपात होणार आहे.

>मुंबईच्या विकासासाठी अर्थसंल्पात महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR) भागाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच ‘ग्रोथ हब’ बनवले जाणार आहे. याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे तयार केली जाणार आहेत.

>अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना समृद्धी महामार्गाबाबत माहिती दिली आहे. समृद्धी महामार्गाचं काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. आगामी काळात हा महामार्ग खुला होणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

>राज्यातील रोजगार वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

>0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौरउर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून लवकरच सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70 टक्के वीज ग्राहकांचे बील टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे.

>प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत 2024-25 साठी 20 लाख घरगुलांच्या उद्दिंष्टांपैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी दिली असून 14 लाख 71 हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यांसाठी 2200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान आता राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौरउर्जा संच देखील बसवले जाणार आहेत.

Tags: ajit pawarMaharashtra Budget 2025Maharashtra Budget 2025 live updatesMaharashtra Budget Analysis 2024-25
ShareTweetSendShare

Related News

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?
राज्य

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!
राज्य

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

Latest News

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

भारताचा दहशतवादाविरूद्धचा हा लढा दहशतवाद्यांना घाम फोडणारा

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

नेते एक, विचार अनेक, काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेचा पर्दाफाश!

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

LIVE | परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूर बद्दल विशेष माहिती देणारी पत्रकार परिषद (०९ मे २०२५)

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.