Stock Market Fall : अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
सकाळी सेन्सेक्स उघडताच त्यात 400 अंकांनी घसरण दिसून आली तर निफ्टी 130 अंकांनी खाली पाहायला मिळाला. सकाळच्या या सत्रात खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेला मोठा फटका बसला या बँकेचे शेअर 20 टक्क्यांनी खाली घसरले.
सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण
आज सकाळी बाजार घसरणीसह उघडला सेन्सेक्स 74,115.17 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत 73,743.88 वर उघडला आणि काही मिनिटांतच तो 400 हून अधिक अंकांनी घसरला आणि 73,672 च्या पातळीवर आला.
दुसरीकडे, निफ्टीमध्ये देखील असंच काहीस पाहायला मिळालं. सोमवारच्या 22,460.30 च्या बंदच्या तुलनेत निफ्टी सकाळी 22,345.95 वर उघडला व काही मिनिटांत 130 हून अधिक अंकांनी घसरून 22,314 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.
शेअर बाजार उघडल्यानंतर 617 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये दिसत होते तर 1715 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. दरम्यान, 105 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
ज्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली त्यामध्ये इंडसइंड बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, टाटा मोटर्समध्ये या कंपन्यांचा समावेश आहे तर आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी आणि ओएनजीसीचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.
अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण
काल अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्याचा परिणाम आज भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला.
तसं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे. पुढे देखील अशीच स्थिती कायम राहणार असल्याचं तज्ञांचं मत आहे. आगामी काळात शेअर बाजार कोसळणार असल्याचे देखील तज्ञांकडून बोललं जात आहे.