मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सला पुन्हा एका मोठ्या बिघाडाचा सामना करावा लागत आहे. हजारो यूजर सध्या एक्स पोस्ट करू शकत नाहीत. गेल्या 24 तासांत X बंद पडण्याची ही चौथी वेळ आहे. अशातच एक्स कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. एक्सवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे.
सोमवार पासून ‘X’ वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंबंधित माहिती देताना एलोन मस्क यांनी सांगितले की, ‘X’ वर मोठा सायबर हल्ला झाला होता, त्यामुळे सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या.
एलोन मस्क यांनी याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, X वर झालेला हा सायबर हल्ला सामान्य नव्हता, तो एखाद्या मोठ्या, संघटित गटाने किंवा अगदी एखाद्या देशानेही केला असू शकतो. याचा आम्ही शोध घेत आहोत. असं मस्क यांनी म्हंटल आहे.
X प्लॅटफॉर्मवरील काम बंद पडल्यामुळे यूजर्संना लॉगिन, पोस्टिंग आणि लोडिंग सारख्या समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही आणि प्लॅटफॉर्म अजूनही अस्थिर आहे.
दरम्यान, एलोन मस्क यांनी X ऑक्टोबर 2022 मध्ये विकत घेतले होते. X खरेदी केल्यानंतर मस्क यांनी यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले होते. तसेच हजारो लोकांनाही X चालवण्यापासून बॅन केले होते. यामध्ये भारतात प्रतिष्टीत लोकांचाही समावेश आहे.