डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडी मैदानावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेत लहान मुल प्रशिक्षण घेत असताना याठकाणी काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना ९ मार्चला रात्रीच्या सुमारास घडली. सुदौवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची असून, शाखेचे अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार हे शाखेचं कामकाज पाहतात. डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वीर सावरकर शाखा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या शाखेत लहान मुले आणि तरुण मोठ्या संख्येने येतात. याच शाखेवर अज्ञातांनीही दगडफेक केली. शाखेजवळच्या जंगलातून अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक करण्यात आली. व काही इमारतींमध्ये लपलेल्या अज्ञातांनीही दगडफेक केली.
दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी संताप व्यक्त केला. दगडफेकीनंतर संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.