Devendra Fadnavis : आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थानास्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांनी भोंग्यांबाबत नियमावली सादर करत राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. असं स्पष्ट केलं आहे. आणि जर कोणाकडून या नियमांचे उलंघन झाले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.
तसेच जर पोलीस निरीक्षकाने जर याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?
-कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे.
-भोंगे रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजे.
-सकाळी ६ ते रात्री १० वाजतेपर्यंत भोंगे लावता येणार आहे.
-दिवसा भोंग्याचा आवाज ५५ डेसिबल आणि रात्री डेसिबलपर्यंत असला पाहिजे. त्यापेक्षा जास्त मर्यादा असू नये,
-कायद्यानुसार अधिक डेसिबल एखादा भोंगा वाजत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला कारवाई अधिकार केंद्र सरकारने दिलेत.
दरम्यान, आमदार देवयानी फरांदेंनी राज्यातील भोंग्यांसंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भोंग्यांवर कठोर कारवाई होईल का? असा सवाल फरांदे यांनी केला होता. त्यावर ख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘भोंग्यांचा विषय धार्मिक नाही, तर ध्वनी प्रदूषणाचा आहे.’ त्यामुळे कोणत्याही धार्मिक स्थळी असलेल्या भोंग्यांनी कायदेशीर मर्यादा ओलांडल्यास त्यावर कठोर कारवाई होईल. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल आहे.