केंद्रीय सरकारने मंगळवारी काश्मीरमधील दोन गटांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत पाच वर्षांसाठी बंदी जाहीर केलं आहे. उमर फारूख यांच्या नेतृत्वाखालील अवामी कृती समिती (एएसी) आणि मसरूर अब्बास अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन (जेकेआयएम) या दोन संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या दोन्ही संघटनांचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवादी कारवायांना आणि भारतविरोधी प्रचाराला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून ही करवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
क्रेंद्रिय गृह मंत्रालयाने सादर केलेल्या अधिसूचनेत म्हंटले आहे की, ‘या संस्था बेकायदेशीर कार्यात देखील सामील आहेत, जी देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी हानिकारक आहे.’
पुढे असेही सांगण्यात आले आहे की, जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादाला चालना देण्यासाठी दोन्ही संघटनेचे सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये आणि भारतविरोधी प्रचारात सामील असल्याचे आढळून आले आहे. या सगळ्यांचा विचार करता मंत्रालयाने दोन्ही संघटनांना बेकायदेशीर क्रियाकलाप अधिनियम १९६७ अंतर्गत पाच वर्षे बंदी घातली आहे.