पाकिस्तानात मांगवारी २१४ प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचे अपहरण केले आहे. ही कारवाई बलुच लिबरेशन आर्मी संघटनेकडूत न करण्यात आली आहे. यात पाकिस्तानच्या काही जवानांना मारल्याची देखील माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अजून कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
दरम्यान, पाकिस्तान सरकारकडून अपहरण केलेल्या ट्रेनमधून १०४ प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, बलुच लिबरेशन आर्मीने त्यांना सोडण्यात असल्याचा दावा केला आहे.
बलुच लिबरेशन आर्मी संघटनेकडून हल्ला कसा झाला?
जाफर एक्सप्रेसवर जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. गुदालार आणि पिरू कुनरी या पर्वतीय भागात सशस्त्र हल्लेखोरांनी बोगद्याच्या आत ट्रेन थांबली आणि ताब्यात घेतली. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला जात होती.
हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली?
या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी संघटनेने घेतली आहे. बलुच लिबरेशन आर्मी संघटनेकडून एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ‘सरकारने आमच्या लोकांची तुरूंगातून सुटका करावी. तरच आम्ही ताब्यात घेतलेले प्रवासी सोडू.’
सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला त्वरित प्रतिसाद दिला नाही, पण पाकिस्तान सरकारने यापूर्वी असे प्रस्ताव नाकारले आहेत. अशातच आता पाकिस्तान साकार कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बलुच लिबरेशन आर्मी संघटना काय आहे?
बलोच लिबरेशन आर्मीची स्थापना 2000 साली झाली. ही आर्मी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. बलुचिस्तानमधील सर्वात मोठी सशस्त्र संघटना असल्याचा त्यांचा दावा आहे. पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांनी लुच लिबरेशन आर्मी संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा परंतु किमान लोकसंख्या असलेला प्रांत आहे. ही दहशतवादी संघटना बर्याच दशकांपासून पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरूद्ध लढत आहे. पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, बलुच लिबरेशन आर्मी संघटनेमध्ये सुमारे 3,000 सैनिक आहेत.
बलुच लिबरेशन आर्मी संघटनेचे काय ध्येय आहे?
बलुच लिबरेशन आर्मी संघटनेचा असा आरोप आहे की पाकिस्तानने 1948 मध्ये बलुचिस्तान जबरदस्तीने ताब्यात घेतले. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने आमच्या नैसर्गिक संसाधनांचे देखील शोषण केल्याचा आरोप केला आहे. आणि म्हणून बलुच समुदाय दारिद्र्याचा सामना करत आहे असंही त्यांच म्हणणं आहे. अशास्थितीत बलुच लिबरेशन आर्मी संघटना स्वतंत्र देश बनविण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, समोर आलेल्या अहवालानुसार, जाफर एक्सप्रेसवर हल्ला करणाऱ्या काही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, काही प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. पण उर्वरित दहशतवाद्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. ज्यांचा शोध पाकिस्तानच्या सुरक्षा दलांकडून सुरु आहे.