विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाचं सर्वच क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे. तसंच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरला आहे.
या चित्रपटाने अवघ्या २५ दिवसातच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तर येत्या दिवसात चित्रपट 6-7 कोटी रुपयांचा गल्ला करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकी कौशालच्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच एकाच दिवसात 31 कोटी रुपयांचा गल्ला केला होता तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 37 कोटी व तिसर्या दिवशी 48 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
अवघ्या २५ दिवसात ५०० कोटींचा गल्ला करणाऱ्या या चित्रपटाने मोठ्या-मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. यात एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली-२’ चा समावेश आहे.
आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत ‘छावा’ बॉलीवूडमधील सहावा चित्रपट आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता तेव्हापासून चित्रपटाचा गल्ला वाढतच चालला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रश्मीका मंदाना आहे. जिने येसूबाईंची भूमिका साकारली आहे.