रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे चलनात मोठा बदल होणार आहे. लवकरच चलनात १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात येणार आहेत. नोटांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नसून या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शाकतीकंत दास यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संजय माल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ‘जुन्या १०० आणि २०० रुपयांच्या बदलल्या जाणार नाहीत त्या चलनात राहतील. फक्त नवीन नोटांवर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय माल्होत्रा यांची सही असेल. नवीन नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध होतील असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
आरबीआयने सांगितले आहे की, ‘नवीन नोटांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त नवीन गव्हर्नर यांची सही नोटांवर असेल. याशिवाय कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच जुन्या सर्व १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात राहतील असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ असा की व्यक्ती किंवा व्यवसायांना जुन्या नोटा बदलण्याची आवश्यकता नाही, कारण त्या सर्व व्यवहारांसाठी वैध राहतील. आरबीआयचे हे पाऊल चलन व्यवस्थेत बदल करण्याऐवजी केवळ प्रशासकीय सुधारणा आहे.