पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ आणि १२ तारखेला मॉरिशसच्या दौऱ्यावर होते. मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलम यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्यांचे निमंत्रण स्वीकारून मोदी दोन दिवसीय दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार देखील झाले आहेत. ज्यावर पंतप्रधान मोदींनी सह्या केल्या आहेत.
यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य आणि भागीदारी याअंतर्गत करार करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत यासंबंधित माहिती दिली.
यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘भारत आणि मॉरिशस यांचे नाते केवळ हिंद महासागरामुळे जोडले गेलेले नाही, तर आपल्या सामायिक सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांमुळेही दृढ आहे. आम्ही एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहोत – नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोविड संकट, संरक्षण असो किंवा शिक्षण, आरोग्य असो किंवा अंतराळ क्षेत्र, आम्ही प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून पुढे जात आहोत. गेल्या दहा वर्षांत आपण आपल्या संबंधांमध्ये अनेक नवीन पैलू जोडले आहेत.” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
दोन्ही देशांमध्ये कोणते करार करण्यात आले?
>सेंट्रल बँक ऑफ मॉरिशस आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टमवर सामंजस्य करार.
>पाईप रिप्लेसमेंट प्रोग्राम अंतर्गत केंद्रीय जल प्राधिकरणाद्वारे हाती घेतलेल्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी मॉरिशस सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात क्रेडिट लाइनवर करार.
>भारतीय परराष्ट्र सेवा संस्था आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, प्रादेशिक एकात्मता आणि मॉरिशसचे आंतरराष्ट्रीय व्यापार मुत्सद्दींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम यांच्यात सामंजस्य करार.
>भारतीय नौदल आणि मॉरिशस पोलीस दल यांच्यात व्हाईट शिपिंग माहिती सामायिक करण्याबाबत तांत्रिक करार.
>मॉरिशसचे आर्थिक गुन्हे आयोग आणि भारताचे अंमलबजावणी संचालनालय यांच्यात सामंजस्य करार.
>मॉरिशसचे उद्योग मंत्रालय, एसएमई आणि सहकार मंत्रालय आणि भारताचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.
>मॉरिशसचे सार्वजनिक सेवा आणि प्रशासकीय सुधारणा मंत्रालय आणि नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, भारत यांच्यात सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर सामंजस्य करार.
>भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, भारताचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि महाद्वीपीय शेल्फ विभाग, सागरी क्षेत्र प्रशासन आणि अन्वेषण, मॉरिशसच्या पंतप्रधानांचे कार्यालय यांच्यात सामंजस्य करार
दरम्यान, मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय आहेत.