दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दणका मिळाला आहे. सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी केजरीवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
2019 मध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीत केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाबसिंह आणि द्वारका नगरसेवक नीतिका शर्मा यांनी परिसरातील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा जाणूनबुजून गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. होळीनंतर केजरीवा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
न्यायालयाने द्वारका दक्षिण पोलिसांना या प्रकरणी एफआयआर नोंदवून एसएचओला 18 मार्चपर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे प्रकरण 2019 मधलं आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाब सिंह आणि द्वारकाच्या नगरसेवक नितिका शर्मा यांनी परिसरात विविध ठिकाणी मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने सप्टेंबर 2022 मध्ये तक्रार फेटाळण्याचा आदेश दिला. यानंतर सत्र न्यायाधीशांनी प्रकरण पुन्हा दंडाधिकारी न्यायालयात पाठवले. या प्रकरणी विशेष न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयाला या प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्यास सांगितले होते.