होळीपूर्वी इस्रोने देशाला मोठी भेट दिली आहे. इस्रोने स्पॅडेक्स उपग्रहाचे यशस्वीरित्या अनडॉकिंग केले आहे. या यशस्वी अनडॉकिंगमुळे चांद्रयान-4 चा मार्ग मोकळा झाला आहे. अंतराळ उपग्रहांना एकत्र जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात आणि त्यांना वेगळे करण्याच्या प्रक्रियेला अनडॉकिंग म्हणतात.
इस्रोचे हे यश भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी, इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स उपग्रह प्रक्षेपित केले होते.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान विभागाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘X’ वर पोस्ट करत लिहिले आहे की, ‘इस्रो टीमचे अभिनंदन…ही प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची बाब आहे. स्पॅडेक्स उपग्रहांनी डी-डॉकिंग पूर्ण केले आहे. यामुळे भारतीय अंतरिक्ष स्टेशन, चांद्रयान ४ आणि गगनयान यासारख्या महत्त्वाकांक्षी भविष्यातील मोहिमांच्या सुरळीत अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे उत्साह वाढत आहे. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Union MoS(Ind. Charge) Science & Technology; Earth Sciences, Jitendra Singh tweets, "Congrats, team ISRO. It is heartening for every Indian. SPADEX Satellites accomplished the unbelievable De-Docking… This paves the way for the smooth conduct of ambitious future missions,… pic.twitter.com/EiT8PQqGmS
— ANI (@ANI) March 13, 2025
यापूर्वी 16 जानेवारी रोजी भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली होती आणि जगातील निवडक देशांच्या क्लबमध्ये सामील झाला होता. इस्रोने ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ (SPADEX) अंतर्गत उपग्रहांना यशस्वीरित्या ‘डॉक’ केले होते. म्हणजे जोडले होते. यासह भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.
इस्रोच्य स्पेसएक्स मिशनला ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर भारताने अमेरिका, रशिया आणि चीनची बरोबरी केली.