पोर्तुगालचे पंतप्रधान ल्युइस मॉन्टेनेग्रो यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. अशास्थितीत, ल्युइस मॉन्टेनेग्रो यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ल्युइस मॉन्टेनेग्रो यांचे सरकार वर्षभर देखील टिकू शकले नाही. अशास्थितीत आता पोर्तुगालमध्ये ३ वर्षाच्या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा निवडणूक घेण्याची वेळ आहे. देशात दुसरे सरकार स्थापन होईपर्यंत मॉन्टेनेग्रो देशाचे काळजीवाहू पंतप्रधान असतील.
1974 च्या क्रांतीनंतर पोर्तुगालने पाहिलेली ही सर्वात मोठी राजकीय अस्थिरता आहे. कमी मतांमुळे ल्युइस मॉन्टेनेग्रो त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. पंतप्रधान ल्युइस मॉन्टेनेग्रो यांच्याकडे 230 पैकी केवळ 80 जागा होत्या. त्याचवेळी, विरोधी पक्षाच्या 128 खासदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. आणि त्यांच्या सरकार पाडण्यात आले.
मॉन्टेनेग्रो यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान ल्युइस मॉन्टेनेग्रो यांच्या कुटुंबाची कायदा फर्म एका कॅसिनो कंपनीकडून महिन्याला हप्ता घेत होती. याविरोधात विरोधी पक्षाने चौकशीची मागणी केली, ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला. आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, ल्युइस मॉन्टेनेग्रो यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.