भारताने संरक्षण क्षेत्रात आणलेला एक अत्याधुनिक यांत्रिक बदल म्हणजे S-400 ट्रायंफ क्षेपणास्त्र प्रणाली. रशियाकडून प्राप्त केलेली ही प्रणाली आता भारताच्या आकाशाची रक्षक बनली आहे. २०१८ मध्ये रशियाशी झालेल्या ५.४३ अब्ज डॉलर (सुमारे ₹४०,००० कोटी) करारानुसार भारताने पाच युनिट्स S-400 प्रणाली खरेदी केली आणि २०२१ पासून ही प्रणाली तैनात केली. सध्या ही प्रणाली भारताच्या सीमेवर कार्यरत आहे, आणि पाकिस्तानी हल्ल्यांना यशस्वीरित्या परतवते आहे.खरतर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल याची याची भारताला आधीच कल्पना होती. त्यामुळेच भारताने आपले ‘सुदर्शन चक्र’ सक्रिय केले. पण भारताच्या संरक्षण सज्जतेत वाढ करणारे सुदर्शन चक्र अर्थात एस-400 नेमके आहे तरी काय? सविस्तर जाणून घेऊयात.
S-400: शक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम
S-400 ट्रायंफ प्रणाली एक अत्याधुनिक पृष्ठभाग ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी 600 किलोमीटर दूरवर लक्ष्य शोधू शकते आणि 400 किलोमीटर पर्यंत त्याला नष्ट करू शकते. या प्रणालीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ती लढाऊ विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर प्रभावीपणे कारवाई करू शकते. विशेषतः या प्रणालीमध्ये एका वेळी १०० हून अधिक लक्ष्यांवर लक्ष ठेवण्याची क्षमता आहे. भारताने हे प्रणाली तैनात केल्यानंतर देशाच्या आकाशातील सुरक्षिततेत आणि सामर्थ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच्या रुपाने भारतीय वायुदलाच्या शक्तीला आणखी एक उत्तम हत्यार मिळाल्याने हा भारताच्या संरक्षण यंत्रणेतील एक मोठा टप्पा ठरला आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न
भारताच्या सशस्त्र दलांनी नुकत्याच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा यशस्वीरित्या सामना केला. पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, भुज यासारख्या ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला होता. मात्र, भारताच्या S-400 प्रणालीने या सर्व हल्ल्यांना तात्काळ निष्क्रिय केले आणि पाकिस्तानचा कुटील डाव उधळून लावला. या सर्व हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने एक खूप महत्त्वाचे संदेश दिला आहे. तो म्हणजे भारताची सुरक्षा यंत्रणा, विशेषतः S-400 सुदर्शन चक्र, आकाशातून घातलेल्या प्रत्येक हल्ल्याला रोखण्यासाठी सक्षम आहे.
‘सुदर्शन चक्र’, नावातच सामर्थ्य!
भारतीय सैन्याने S-400 प्रणालीला ‘सुदर्शन चक्र’ असे नाव दिले आहे. हे नाव भारतीय पुराणकथांतील भगवान विष्णूच्या अत्यंत सामर्थ्यशाली अस्त्रावरून प्रेरित आहे. या अस्त्रानेच त्या वेळच्या राक्षसांचा वध केला होता. याच प्रकारे S-400 प्रणालीला भारताच्या आकाशातील सर्व धोके नष्ट करण्यासाठी हे एक अत्याधुनिक अस्त्र मानले जात आहे.सुदर्शन चक्र हे केवळ नाव नाही, तर भारताच्या आकाशाचे रक्षण करणारे चक्रव्यूह आहे. S-400 प्रणालीची सुसज्जता आणि कार्यक्षमता यामुळे भारताच्या आकाशामध्ये एक अभेद्य भिंत तयार झाली आहे. जी पाकिस्तानच्या हल्ल्यांना थोपविण्याचे काम करत आहे. आज हे केवळ एक तंत्रज्ञान नव्हे, तर भारताच्या आत्मनिर्भरतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे.
भारताच्या संरक्षण धोरणातील एक मोठा टप्पा
खरतर S-400 प्रणाली भारताच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. भारताने 2018 मध्ये हा मोठा निर्णय घेतला आणि आज तो किती योग्य होता हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. या शक्तिशाली प्रणालीमुळे भारताचे लष्कर आता पाकिस्तान आणि चीनकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांना यशस्वीरित्या थोपवू शकते. त्यामुळे भारताचे हवाई संरक्षण अधिक मजबूत झाले आहे. S-400 ही प्रणाली भारतासाठी एक प्रकारचा “गेम-चेंजर” ठरली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. थोडक्यात सांगायचं तर, भारताने वेळेवर घेतलेला हा निर्णय आज देशाच्या सुरक्षेसाठी एक मजबूत आधार बनला आहे.
संयम आणि रणनीतिक उत्तर
भारताने या संकटाच्या प्रसंगी संयम राखत प्रमाणबद्ध प्रतिसाद दिला आहे. भारताने आधीच सांगितले होते की, पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला, तर त्याला योग्य प्रतिसाद दिला जाईल, मात्र भारताच्या सीमेवर शांती राहिल्यास भारत तणाव वाढवणार नाही. भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, प्रत्युत्तर दिले असले तरी भारत हवे तेव्हा आणि शिस्तीनेच तणाव कमी करेल, भारताच्या संयमी भुमिकेवरुन भारत हा नेहमी शांततेलाच प्राधान्य देतो हे दिसून येते. पण पाकिस्तान सारख्या धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या मुजोर देशाला जगात शांतता नांदावी असे वाटत नाही. त्यामुळेच तो कायम कट्टतेला प्राधान्य देत आला आहे. पहलगाम येथील धर्म विचारुन केलेला हल्ला देखील धर्मांधतेतून आणि शांतता नष्ट करण्याच्या उद्देशानेच घडवून आणला होता. पण भारताने त्यांच्या या हल्ल्याला आधी ऑपरेशन सिंदूर आणि आता ‘सुदर्शन चक्राच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. वस्तुतः सुदर्शन चक्राने पाकिस्तानची मस्ती उतरवली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एकुणच S-400 या प्रणालीने भारताच्या आकाशाला एक अभेद्य कवच प्रदान केले आहे. ज्यामुळे शत्रू कोणत्याही परिस्थितीत भारताच्या हद्दीला पार करण्याचा विचार देखील करणार नाही.
India's Sudarshan Chakra – S-400 Air Defence Missile system saving our India and Indian Army. S-400 demolished the Pakistani air attack!
Thank you President Putin for this absolute solid weapon gift 🇷🇺 🇮🇳🤝#IndiaPakistanWar2025 #OperationSindoor #S400 #IndianNavyAction pic.twitter.com/snMPoADWZp
— अखण्ड भारत संकल्प (@Akhand_Bharat_S) May 9, 2025