Territorial Army: भारत पाकिस्तानमधील वाढलेला तणाव पाहता संरक्षण मंत्रालयाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संरक्षण मंत्रालयाने आता भूदल प्रमुखांना अधिकार दिला आहे की, ते टेरिटोरियल आर्मी नियम 1948 च्या नियम 33 नुसार टेरिटोरियल आर्मीच्या सर्वच अधिकारी आणि सैनिकांना सुरक्षा ड्यूटीवर बोलवू शकतात. अर्थातच भूदल प्रमुख टेरिटोरियल जवानांना ड्यूटीवर बोलवू शकतात.
टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय:
टेरिटोरियल आर्मी ही भारतीय सैन्याची एक स्वयंसेवी शाखा आहे. टेरिटोरियल आर्मीमध्ये सामान्य नागरिकांना सामील होण्याची संधी असते. जे नागरिक व्यवसाय किंवा इतर नोकरी करत आहेत परंतु ज्यांना देशसेवा करण्याची इच्छा आहे अशा नागरिकांना एक वेळ ठरवून प्रशिक्षण दिले जाते. टेरिटोरियल आर्मीला आवश्यक परिस्थितीत, जसे की युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तातडीने नियमित सैन्याच्या मदतीसाठी बोलावले जाते.
टेरिटोरियल आर्मीची स्थापना:
भारतामध्ये टेरिटोरियल आर्मीची स्थापना ९ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली आहे. या तारखेला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल श्री. सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते टेरिटोरियल सैन्याचे औपचारिक उद्घाटन झाले होते. टेरिटोरियल आर्मीमध्ये सुरवातीला वायु संरक्षण, पैदल, अभियांत्रिकी तसेच सिग्नल रजिमेंट्स यांसारख्या युनिट्स होत्या. परंतु १९७२ पासून या युनिट्स बंद करण्यात आल्या आणि त्याचे केवळ नियमित सैन्यात रूपांतर करण्यात आले. या आर्मीच्या स्थापनेचा मूळ उद्देश हा नियमित सैन्याला मदत करणे हा होता.
टेरिटोरियल आर्मी काम काय करते:
आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच युद्धकाळात किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये ही सेना नियमित सैन्याला आवश्यक ते युनिट्स पुरवते. तसेच नागरी प्रशासनाला सहाय्य करते. म्हणजेच युद्धजन्य परिस्थीतील टेरिटोरियल आर्मी एक मोठे मनुष्यबळ म्हणूनही साहय्यता करते. तसेच युद्धाच्या वेळेस गरज असल्यास मैदानातही उतरते, म्हणूनच टेरिटोरियल आर्मीला ‘पार्ट टाईम सैन्य’ म्हणूनही ओळखली जाते.
संरक्षण मंत्रालयाने आता टेरोटियल आर्मी बोलवण्याचा निर्णय का घेतला आहे:
सध्या भारत आणि पाकिस्तानचे एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. अशा परिस्थीती टेरिटोरियल आर्मी नियमित सैनिकांच्या मदतीस आल्यास सैन्याला अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधने मिळतील. टेरिटोरियल आर्मी आल्याने नियमित सैनिकाची ताकद आणि कार्यक्षमता वाढते, हे याआधी टेरिटोरियल आर्मीने युद्धात घेतलेल्या सहभागामुळे स्पष्ट झाले आहे.
Territorial Army (India's operational reserves) activated. pic.twitter.com/MCPr7DDuSo
— WLVN (@TheLegateIN) May 9, 2025
भारत-पाकिस्तान युद्धात टेरोटियल आर्मी कशी काम करू शकते:
सध्या भारत आणि पाकिस्तान देशाच्या सीमेवर तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षेची जबाबदारी वाढवण्यासाठी आणि इंडियन आर्मीला बळकटी देण्यासाठी टेरिटोरियल आर्मी उपयोगी पडू शकते. तसेच गरज भासल्यास सीमेवरती देखील तैनात केले जाऊ शकते.
टेरिटोरियल आर्मीचा इतिहास:
टेरिटोरियल आर्मीची अनेकदा भारतीय सैन्याला महत्वपूर्ण मदत झाली आहे. टेरिटोरियल आर्मीने देशाच्या स्वातंत्र्यापासून भारतातील जवळपास सर्वच युद्धांमध्ये भाग घेतला आहे. १९६२ चे चीन-भारत युद्ध , १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध , १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि कारगिल युद्धामध्ये टेरिटोरिल आर्मीचा समावेश होता. तसेच श्रीलंकेतील ऑपरेशन पवन (१९८७) , पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक , ईशान्य भारतातील ऑपरेशन रायनो (१९९१) आणि ऑपरेशन बजरंग (१९९०-१९९१) आणि जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रममध्ये देखील टेरिटोरियल आर्मीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.