जम्मू-काश्मीरच्या नयनरम्य डोंगररांगांमध्ये वसलेलं पहलगाम हे ठिकाण, जे “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून जगप्रसिद्ध आहे, तेच आता रक्तरंजित आठवणींनी झाकोळलं गेलं आहे. बैसरन भागात २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्यात २६ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला.या मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. वस्तुतः या हल्ल्याच्या घटनेने महाराष्ट्राला अक्षरशः हादरवून सोडले.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पहलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे ३२ पर्यटक काही काळ तिथे अडकले होते. परंतु स्थानिक प्रशासनाच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या शिवाय या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात कोणकोणत्या घडामोडी घडल्या? ते जाणून घेऊयात.
राज्यभरात संतापाची लाट, मोर्चे आणि निषेध
या क्रूर घटनेनंतर महाराष्ट्रभर तीव्र संताप व्यक्त केला गेला.डोंबिवलीत संपूर्ण बंद पाळण्यात आला, तर उल्हासनगर, जळगाव, सातारा, रत्नागिरी आणि पुणे या शहरांमध्ये निषेध मोर्चे, शांतता रॅली आणि श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले. जळगावात पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादाचा निषेध करण्यात आला तर काही ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर ठेवून त्यावरून वाहने चालवण्यात आली. या दरम्यान विविध शहरातील बहुतांश दुकाने, कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या, याशिवाय सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत, केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची पत्रकार परिषद
पहलगाम हल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत, जखमी पर्यटकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. यामुळे पिडीत कुंटुंबांना आधार मिळाला. एवढेच नाही तर पीडित कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात आला. या निर्णयामुळे सर्व स्तरातून फडणवीस सरकारचे कौतुक करण्यात आले. याशिवाय राज्य सरकारने पहलगाम मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था व मृतांचे पार्थिव आणण्यासाठी मुंबई आणि पुणे विमानतळावर विशेष यंत्रणा राबवली.
राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
हा हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला असला तरी सुद्धा खबरदारी म्हणून फडणवीस सरकारने राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचे निर्देश दिले.राज्यात रेल्वे स्थानके, विमानतळ आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली. यासोबतच, पोलिसांची नाकाबंदी आणि तपासणी मोहीम सुरू करण्यात आली मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.
पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई
या घटनेनंतर केंद्र सरकारने देशात अल्पकालीन व्हिसावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याचा आदेश दिला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करत ५५ पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केलं. तसेच स्थानीय गुप्तचर विभाग आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या मदतीने या संदर्भातला तपास सुरू करण्यात आला.
राष्ट्रीय पातळीवर जोरदार प्रत्युत्तर
दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची अधिकृत माहिती आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. सीमेपलीकडून गोळीबार सुरू असल्याने, आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तणाव वाढल्याने या गोळीबारात महाराष्ट्रातील २५ वर्षीय जवान एम. मुरली नाईक हे शहीद झाले. शहिद मुरली नाईक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. या दरम्यान त्यांनी ५ अतिरेक्यांचा खात्मा केला.
संपूर्ण देश हल्ल्याच्या विरोधात एकवटला
देशभरातील नागरिकांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला केला असून सोशल मिडियावर #JusticeForPahalgamVictims हा ट्रेंड चालू आहे. तसेच अनेक नामवंत कलाकार, खेळाडू आणि सामाजिक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ चे समर्थन केलं आहे.
एकुणच हा हल्ला महाराष्ट्राच्या जनमानसावर खोल ओरखडे घालणारा ठरला आहे. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्यायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. ही बाब केवळ हृदयद्रावकच नाही, तर चिड निर्माण करणारी आहे.
Final list of casualties in the Pahalgam Terror Attack in Kashmir.
26 killed, 17 injured.
India wants revenge! This we will never accept 🙏🏻
Genuinely Khoon Khol raha h pic.twitter.com/QHp4IDLR1m
— Anant Ladha, CFA CA CFP LL.B. (@anantladha25) April 23, 2025