India Pakistan Ceasefire: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिक चिघळले होते. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसखोरी करत दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करायला सुरवात केली, त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत होती. अखेर १० मे रोजी या युद्धजन्य परिस्थितीला विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत आहे. यानंतर सामान्य नागरिक आणि राजकीय नेत्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेऊयात.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी तात्काळ युद्धबंदी जाहिर केली. भारतीय लष्कराने अल्पावधीतच आपली ताकद दाखवून दिली. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला याचे सर्व देशवासीयांना समाधान आहे, अशी पोस्ट शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरती केली आहे.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी तात्काळ युद्धबंदी जाहिर केली. भारतीय लष्कराने अल्पावधीतच आपली ताकद दाखवून दिली. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला याचे सर्व देशवासीयांना समाधान आहे. भारतीय लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कारवाईत…
— Supriya Sule (@supriya_sule) May 10, 2025
भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं.जय हिंद!, अशी पोस्ट शरद पवार यांनी एक्सवरती केली आहे.
भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.
पाकिस्तानकडून…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2025
भारत-पाकिस्तान या देशांनी युद्धबंदीचा मार्ग स्वीकारला हे स्वागतार्ह आहे. भारत शांतताप्रिय देश असून बुद्धाची भूमी आहे. अहिंसेची भूमी आहे. मात्र या देशाच्या एकात्मतेला तडा देणाऱ्या कुठल्याही घडामोडीचा आम्ही टिकाव लागू देणार नाही. गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने अत्यंत जबाबदारीने केलेली कामगिरी वंदनीय आहे. या काळात भारतीय लष्कर नावाची एक संरक्षित ढाल आपण अनुभवली, असे मत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक्सवरती व्यक्त केले आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1921204013883621645
भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर काॅंग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटले आहे की, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक विशेष संसदीय अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी विरोधी पक्षांची एकमुखी मागणी पुन्हा केली आहे.
विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक विशेष संसदीय अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी विरोधी पक्षांची एकमुखी मागणी पुन्हा केली आहे.
या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प… pic.twitter.com/IdqjCZ3z4E
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) May 11, 2025
भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर आणि त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधींच्या उल्लंघनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हटले आहेत की, “पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करुन सुरुवात केली होती. त्यांना आपण उत्तर दिले. त्यानंतर शस्त्र विराम दोन्ही देशांनी चर्चा करुन केला होता. मात्र पाकिस्तानने बेईमानी केली. पाकिस्तानने अशा पद्धतीने याआधीही अनेकदा शस्त्रविरामाचं उल्लंघन केले होते. पण मोदींनी त्यांना आणखी एक संधी दिली. तरीही आपल्या नागरिकांवर पाकिस्तानने हल्ला केला. मात्र त्याचा करारा जवाब पाकिस्तानला देण्यात आला आहे. पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल असे भारतीय लष्कराला वाटलेही होतं. त्यामुळे शस्त्रविरामासंदर्भात कुठलीही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नव्हती. आता पाकिस्तान जर वारंवार जर या गोष्टी करणार असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल.”
कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असते. ते योग्य वेळी थांबले पाहिजे. अमेरिकेन आधी सांगितले होते, हा आमचा प्रश्न नाही. अमेरिकेने ही घोषणा केली मात्र पुन्हा युद्ध सुरू झाले होते. सध्या युद्ध थांबले आहे. हे समजत आहे. आमच्या लोकांवर हल्ला केला त्याचा सैन्याने मोठा बदला घेतला. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यासारखा नाही हे खरे आहे. त्यांना हा मोठा धडा मिळाला आहे. पुढे कुरापती होणार नाही असे वाटत नाही. अनेक दहशतवादी यात ठार झाले आहे. युद्ध थांबले असेल तर चांगले आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शस्त्रसंधीनंतर दिली आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत आक्षेप घेत, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा काय संबंध? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती पण राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली, असा हल्लाबोल त्यांनी केंद्रसरकारवर केला आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1921438634072519134a