Monday, May 12, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

News Desk by News Desk
May 12, 2025, 02:31 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर झळकला. मात्र, यावेळी युद्धाच्या पारंपरिक सीमांपलीकडे जाऊन, एक नव्या प्रकारचे युद्ध लढले गेले ते म्हणजे माहिती युद्ध. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या युद्धात चीन,अझरबैजान,आणि तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने उघड भूमिका घेतली. त्यांनी केवळ शब्दाने नाही तर त्यांच्या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनही पाकिस्तानला भक्कम पाठिंबा दिला. आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरला विरोध केला. खरतर या तिन्ही देशांना भारतानं संकटात मदत केली आहे. पण त्यांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यासारखा भारताला धोका दिला. ही तक्रार आता सर्वसामान्य भारतीयांच्या मनात निर्माण झाली आहे. नेमकं काय झालंय? या देशांनी भारताला धोका कसा आणि का दिला? सविस्तर जाणून घेऊयात.

सर्वप्रथम या तिन्ही देशांना भारताने कशी मदत केली ते जाणून घेऊयात.

भारताला विरोध करणाऱ्या यादीतील पहिला देश आहे तुर्की ही तीच तुर्की आहे जिथं 2023 मध्ये भयंकर भूकंप झाला होता. तेंव्हा भारतानं तातडीनं “ऑपरेशन दोस्त” अंतर्गत मदतीचा ओघ सुरू केला. यामध्ये वैद्यकीय पथकं, श्वानपथकं, अन्न, औषधे, फील्ड हॉस्पिटल ब्लँकेट, तंबू आणि इतर मदत सामग्री यांसारख्या अत्यावश्यक पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. एवढंच नव्हे, तर भारतीय पर्यटकांचा वाढता प्रवास तुर्कीच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना देतोय. तरीही 7 मे रोजी तुर्कीने भारताच्या कारवाईवर टीका करत, “भारताची कृती प्रक्षोभक असून, युद्धाचा धोका निर्माण करते,” असं वक्तव्य केलं.

Regarding the Recent Developments Between Pakistan and India https://t.co/6Eg6YpIzit pic.twitter.com/VQIqIqoVZh

— Turkish MFA (@MFATurkiye) May 7, 2025

दुसरा देश आहे अझरबैजान – 2024 मध्ये 2.43 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिलेला देश. व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात भारताने अब्जावधी डॉलर्स गुंतवले आहेत. याच अझरबैजाननेही पाकिस्तानसोबत उभं राहत, भारताविरुद्ध वक्तव्य केलं. त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकांबाबत सहानुभूती व्यक्त करत, भारताच्या कारवाईचा निषेध केला.

#OperationSindoor | The Republic of Azerbaijan expresses its concern over the further escalation of tension between the Republic of India and the Islamic Republic of Pakistan. We condemn military attacks against the Islamic Republic of Pakistan that killed and injured several… pic.twitter.com/rLU6RpWMGK

— ANI (@ANI) May 7, 2025

तिसरं उदाहरण म्हणजे चीन. भारताने 1950 साली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला सर्वप्रथम मान्यता दिली. 2008 च्या सिचुआन भूकंपात भारताने 5 दशलक्ष डॉलरची मदत दिली. एवढच नाही तर 2020 मध्ये कोरोना साथीच्या सुरुवातीस वुहानमध्ये वैद्यकीय सामग्री पाठवली. पण या सर्व स्नेहसंबंधांचा विसर पाडून, चीनने भारताच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

http://pk.china-embassy.gov.cn/eng/zbgx/202505/t20250507_11616596.htm

माध्यमांना हाती घेऊन भारताला विरोध
ग्लोबल टाईम्स, शिन्हुआ न्यूज एजन्सी (चीन) आणि टीआरटी वर्ल्ड (तुर्की) या प्रमुख सरकारी माध्यम संस्थांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या बाजूने एकतर्फी आणि बिनधास्त प्रचार सुरू केला. या माध्यमांनी कोणतीही पडताळणी न करता पाकिस्तानी सैन्याचे खोटे दावे, संपादित व्हिडीओ आणि चुकीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित केली. यामागे स्पष्ट हेतू होता, जगभरातील लोकांचे मत वळवणे आणि भारताविरोधात आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणे.

विश्वासार्हतेचा बळी
तज्ज्ञांच्या मते, ही भूमिका अत्यंत जबाबदारीहीन होती. विशेषतः बीजिंगस्थित ग्लोबल टाईम्स आणि शिन्हुआ यांच्याबाबत विश्वासार्हतेचा मुद्दा नवीन नाही. पण टीआरटी वर्ल्डसारख्या तुर्कीच्या माध्यम संस्थेनेही अशा प्रचारात सहभाग घेणे चिंताजनक मानले जात आहे. या प्रचार युद्धामुळे या संस्थांची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे.

शस्त्रांऐवजी प्रचाराची भूमिका
या संघर्षात चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला प्रत्यक्ष शस्त्र नव्हे, तर माहितीच्या माध्यमातून ताकद दिली. खरतर आजचे युद्ध केवळ रणभूमीवर लढले जात नाही, तर डिजिटल स्क्रीनवरही तेवढ्याच तीव्रतेने लढले जाते. प्रत्यक्ष लढाईत विजय मिळवणे जितके महत्त्वाचे, तितकेच महत्त्वाचे आहे, जगाला काय दाखवले जाते. आजच्या युद्धात “धारणा” म्हणजे perception हीच खरी रणनिती ठरते. आपल्या देशाबद्दल जगात काय चित्र उभं राहतं, हे काही वेळा रणभूमीवरील विजय-पराजयाइतकंच महत्त्वाचं ठरतं.चीन आणि तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने हेच perception war खेळलं. त्यांनी एकीकडे लष्करी मदत न करता, दुसऱ्या बाजूला जगभरातील लोकांच्या मनात पाकिस्तानबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भारताच्या जागतिक प्रतिमेला धक्का देण्याचा यत्न झाला.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक संघर्षाच्या कथानकात चीन आणि तुर्कीने माहिती युद्धाच्या (Information warfare) माध्यमातून जे काही केले, ते केवळ राजकीयच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही गंभीर आहे. जगातील लोकशाही आणि माहिती स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही हे संकेत चिंतेचे आहेत. युद्ध रणभूमीवर संपत नाही ते ‘मनात’ जिंकावे लागते, पण सध्या या युद्धात खोटेपणा मोठ्या प्रमाणात शस्त्र म्हणून वापरला जात आहे. या तिन्ही देशांनी भारताच्या ऐवजी पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत, संकटाच्या वेळी दाखवलेल्या मदतीला एकप्रकारे हरताळच फासला आहे. भारताने सहानुभूतीने केलेली मदत विसरून, या तिन्ही देशांनी राजकीय आणि सामरिक हितसंबंधांसाठी भारताविरोधात भूमिका घेतली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध हे हितसंबंधांवर चालतात, भावनांवर नाहीत. त्यामुळे भारताला आता भविष्यकाळात अधिक सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

Tags: AzerbaijanBADI BAATchinaoperation sindoorTurkey
ShareTweetSendShare

Related News

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस
आंतरराष्ट्रीय

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?
आंतरराष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी
आंतरराष्ट्रीय

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम
आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध
आंतरराष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा भारतविरोध

Latest News

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

१९७१ च्या विजयात हरवलेली २०२५ ची काँग्रेस

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नेमके काय घडले? वाचा सविस्तर

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेतून भारताने नेमके काय मिळवले?

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

मित्रतेची किंमत: मदत करुनही या देशांनी भारताला दिला धोका

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

भारत- पाकिस्तान युद्धबंदी नंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

Auto Draft

LIVE भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाप्रमुखांकडून ऑपरेशन ‘सिंदूर’ बाबत पत्रकार परिषद

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पहलगाम हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले?

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

पत्रकार परिषद ते रणांगण: भारताच्या सज्जतेची व प्रतिउत्तराची कहाणी

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबले पण भारताची दहशतवादविरोधी भूमिका कायम

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

टेरिटोरियल आर्मीची होणार युद्धात एन्ट्री; काय आहे टेरिटोरियल आर्मी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.