पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 26 एप्रिल रोजी नवी दिल्लीच्या साउथ ब्लॉकमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने “निषेध नव्हे, तर निर्णायक कृती” करण्याचा इशारा दिला. त्यानंतर 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ ची घोषणा झाली. ही मोहीम म्हणजे भारताच्या संयमाचा अंत आणि सर्जनशील सामर्थ्याची सुरुवात होती. त्यानंतर 9 आणि 10 मेच्या रात्री भारताने एक निर्णायक पाऊल उचलत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये खोलवर घुसून दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेमुळे भारताने दहशतवाद आणि त्याच्या पाठीराख्यांविरोधात आपली कठोर भूमिका स्पष्ट केली. पण या महत्वाकांक्षी ऑपरेशन मधून भारताला नेमकं काय मिळालं? किंवा या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला कशी अद्दल घडवली तेच आपण जाणून घेणार आहोत.
1. दहशतवादी छावण्यांचा खात्मा
या मोहिमेमध्ये भारताने लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या 9 महत्त्वाच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. ही ठिकाणं दहशतवादी कारवायांची केंद्रस्थानं होती.
2. पाकिस्तानच्या आरपार जाऊन कारवाई
भारताने केवळ PoK नव्हे, तर पाकिस्तानच्या मध्यभागात बहावलपूरसारख्या संवेदनशील भागात सुद्धा अचूक हल्ले करून दाखवले की जर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल.तर भारत आता कोणतीही लालरेषा ओलांडू शकतो,
3. दहशतवाद्यांसोबत पाठीराख्यांनाही लक्ष्य
पहिल्यांदाच भारताने स्पष्टपणे दाखवून दिलं की केवळ दहशतवादीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्यसंस्थांनाही लक्ष्य केलं जाईल.
4. पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेची पोलखोल
भारतीय राफेल जेट विमानांनी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा देत अत्यंत अचूकपणे लक्ष्य साधलं. SCALP आणि HAMMER सारख्या आधुनिक क्षेपणास्त्रांचा प्रभाव दाखवून दिला.
5. भारताच्या हवाई संरक्षणाची ताकद
‘आकाशतीर’ प्रणालीसारख्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांनी शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केलं, आणि भारताच्या संरक्षण सज्जतेचा स्तर उंचावला.
6. अत्यंत अचूक आणि मर्यादित हल्ले
भारताने केवळ दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करत कोणतीही नागरी हानी होणार नाही याची काळजी घेतली. ही ऑपरेशनची नैतिक बाजूही जगासमोर ठसवून सांगणारी बाब ठरली.
7. प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा
या हल्ल्यांमध्ये भारताच्या “मोस्ट वॉन्टेड” यादीतील अनेक दहशतवाद्यांचा नायनाट झाला. काही तळे आणि गटांचे नेतृत्वही एका रात्रीत संपवलं गेलं.
8. पाकिस्तानच्या लष्करी तळांना जबर झटका
एकूण 11 लष्करी तळांवर भारताने अचूक हल्ले केले. यात पाकिस्तानच्या हवाई दलाची 20% पायाभूत सुविधा नष्ट झाली आणि अनेक लढाऊ विमानं नष्ट झाली.
9. तीनही दलांचं संयुक्त यश
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची ही संयुक्त मोहीम होती, ज्याने भारताच्या वाढत्या युद्ध क्षमतेचं दर्शन घडवलं.
10. जागतिक पाठिंबा मिळवला
पूर्वी भारतावर संयम बाळगण्याचा दबाव टाकणाऱ्या देशांनी यावेळी दहशतवादाविरोधातील या कारवाईला पाठिंबा दर्शवला. हे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचं मोठं यश ठरलं.
11. काश्मीरच्या कथनात बदल
या मोहिमेनंतर काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा “दहशतवादाविरोधाची लढाई” म्हणून जागतिक मंचावर सादर झाला, ज्यामुळे भारताने नैतिक उच्चतेचं स्थान मिळवलं
एकुणच ऑपरेशन सिंदूर” ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर भारताच्या सहनशीलतेच्या शेवटाची आणि निर्णायक कृतीच्या सुरुवातीची ठोस घोषणा होती. यामधून भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की, सहनशीलतेला मर्यादा असते, आणि ती ओलांडली गेली की भारत शत्रूच्या घरात जाऊन उत्तर देऊ शकतो.ही मोहीम म्हणजे देशाच्या सुरक्षेचा नव्या परिघांमध्ये विस्तार, जागतिक स्तरावर भारताच्या विश्वासार्हतेत वाढ, आणि भविष्यातील धोरणांची स्पष्ट दिशा होती. भारताने या कारवाईतून फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवला नाही, तर आत्मसन्मान, सामर्थ्य आणि नीतिमत्तेचा एक आदर्श उभा केला.आजचा भारत संवादासाठी तयार आहे, पण समर्पणासाठी नाही. आणि हेच “ऑपरेशन सिंदूर”ने ठामपणे सिद्ध केलं आहे.
🔥 #OperationSindoor: Major terror infrastructure CRUSHED!
— 9 terror camps OBLITERATED.
— 100+ terrorists NEUTRALIZED, including Yusuf & Rauf Azhar.
— Noor Khan, Murid, Rafiqui & Sialkot bases ATTACKED.
— Pasrur radar ANNIHILATED.
— Dhandhar post DEMOLISHED.
— 100+ drones SHOT… pic.twitter.com/CCTx1H07YJ— Awaazx (@AwaazX_24x7) May 10, 2025