kirana Hills: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांना चांगलाचा धडा शिकवला. मात्र भारताने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई पाकिस्तानने स्वत:वर ओढवून घेतली. त्यामुळेच भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती.
नेमके किराणा हिल्स प्रकरण काय:
युद्धजन्य परिस्थीती दरम्यान भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्धस्त केले. यावेळी भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील एअर बेसवर हल्ला केल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. कारण तिथून जवळच काही किमी अंतरावर पाकिस्तानच्या अण्वस्त्राचा मोठा साठा आहे, असे म्हटले जाते. पाकिस्तानचा अण्वस्त्राचा साठा ‘किराणा हिल्स’ भागात आहे असे म्हटले जाते. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या अणवस्त्र साठ्यावर हल्ला केला असा दावा पाकिस्तानकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तसेच भारताच्या या हल्ल्यामुळे तेथे आण्विक धोक्याचे सावट निर्माण झाले आहे, असा देखील दावा करण्यात येत आहे.
नेमके किराणा हिल्स परिसरात काय घडत आहे:
भारताच्या हल्ल्यानंतर किराणा हिल्स परिसरात किरणोत्सर्गी गळतीच्या खुणा दिसत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने अमेरिकेचे वैज्ञानिक निरीक्षण पथक आणि विश्लेषकांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हा प्रकार अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यावर जगभरातील संरक्षण यंत्रणा आता बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
भारताकडून यावर काय उत्तर देण्यात आले:
-12 मे रोजी भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या किराणा हिल्स येथील अणवस्त्र साठ्यावर हल्ला केला का?, असा प्रश्न विचारला. त्यावर भारतीय लष्कर अधिकारी एअर मार्शल ए.के. भारती यांनी उत्तर दिले होते.
– एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, “किराणा हिल्समध्ये काही अण्वस्त्र साठा आहे हे आम्हाला माहिती नव्हते. आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केलेला नाही.”
-भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताने पाकिस्तानच्या अण्वस्र साठ्यावरती हल्ला केला नाही. यासाठी भारताने हल्ले कुठे केले हे अगदी स्पष्ट केले तसेच या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाचे उपग्रह प्रतिमा देखील सादर केल्या आहेत.
-तसेच पत्रकार परिषदेत भारती यांनी स्पष्ट केले आहे की, भारताने केवळ पाकिस्तानच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला आहे, यामध्ये कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा, एअर बेस इत्यादींचा समावेश होता.
-खरेतर भारताने ऑपरेशन सिंदूरमध्येही आपली नितिमत्ता जपल्याचे दिसून आले. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने केवळ दहशतवाद्यांना टार्गेट केले होते. मात्र पाकिस्तानने सर्वात प्रथम भारताच्या लष्करी सेवांवर आणि सामान्य नागरिकांवर हल्ला केला. त्यानंतरच भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून लाहोर आणि गुंजरांवाला जवळच्या रडार यंत्रणेवर हल्ला केला.
किराणा हिल्स ठिकाण नेमके काय आहे:
किराणा हिल्स साइट ही पाकिस्तानमधील एक विस्तृत खडकाळ पर्वतश्रेणी आहे. ही पर्वतश्रेणी पाकिस्तान पंजाबमधील सरगोधा जिल्ह्यात आहे. तपकिरी लँडस्केपमुळे स्थानिक पातळीवर ही पर्वतश्रेणी ‘ब्लॅक माउंटन’ म्हणून ओळखली जाते.
-विशेष म्हणजे या ठिकाणी १९८० च्या दशकात बांधलेले भूमिगत बोगदे आहे असे म्हटले जाते. तसेच याच दशकात तेथे भक्कम खंदक बांधल्याचे देखील म्हटले जाते.
– याच ठिकाणी पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असल्याचे म्हटले जाते.
-मात्र याबाबत पाकिस्तानने अधिकृतपणे कधीही माहिती दिली नाही.
दरम्यान, किराणा हिल्सवर भारताने हल्ला केल्यामुळे धोका निर्माण झाला आहे, असा दावा सोशल मीडियावर केला जात असला तरी भारतीय सैन्याकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. तसेच पुरावा म्हणून भारताने काही प्रतिमा देखील सादर केल्या आहेत. त्यामुळे भारताबाबत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते.