नक्षलवाद प्रकरणी जी.एन. साईबाबाची जन्मठेप रद्द करण्यात आली आहे. जी.एन.साईबाबानी नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांच्यासाठी काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच गडचिरोली सत्र न्यायालयाकडून झालेली जन्मठेपेची शिक्षा नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. तर जी एन साईबाबा याच्यासह इतर पाच आरोपींची देखील कोर्टाकडून निर्दोष मुक्ताता करण्यात आली आहे.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता जी एन साईबाबासह पाच जणांची निर्दोष सुटका झाली आहे.
नागपूर खंडपीठाने जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना नक्षलवाद संबंध प्रकरणात दोषी ठरवत 2017 च्या सत्र न्यायालयाच्या आदेशात बदल केला आहे. या प्रकरणी जन्मठेपच्या निकालाला आव्हान देण्यात आले होते. तर आता नागपूर खंडपीठाने जी एन साईबाबासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नेमके प्रकरण काय?
जी एन साईबाबा याला 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जी एन साईबाबा हा नक्षलवाद्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. तर काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी जी एन साईबाबाच्या दिल्लीतील घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी पोलिसांना अनेक डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी जी एन साईबाबाला अटक केली होती.