आज देशाची राजधानी नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची नीती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज NITI आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीची थीम ‘Developed India@2047’ अशी असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे NITI आयोगाचे अध्यक्ष आहेत. या बैठकीला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे हे उल्लेखनीय. जीडीपीने पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठण्याची अपेक्षा आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सहयोगात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. या व्हिजनचा रोडमॅप तयार करणे हा आज होणाऱ्या बैठकीचा उद्देश आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या बहिष्कारावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) हल्ला चढवला असून त्याला दुर्दैवी म्हटले आहे.