Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आता विनेश सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. फायनलपूर्वीच भाजप नेते ब्रिजभूषण सिंह हा मोठा मुद्दा बनला आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी विनेशने भारताच्या रस्त्यावर रात्रंदिवस आंदोलन केले होते. आता ती फायनलमध्ये पोहोचताच तिचे गुरु आणि काका महावीर फोगाट यांनी ब्रिजभूषण सिंगबाबत मौन सोडले आहे. विनेशचा विजय म्हणजे ब्रिजभूषण सिंग यांच्या तोंडावर चापट असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
विनेशच्या विजयानंतर महावीर फोगाट यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी सकाळपासून विनेशच्या जपानी खेळाडूसोबतच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले होते. मी विनेशला संदेश दिला होता की जपानी खेळाडू पायांवर हल्ला करतात, म्हणून पहिल्या फेरीत फक्त बचावात्मक खेळ करावा लागतो आणि दुसऱ्या फेरीत आक्रमक खेळ करावा लागतो. विनेशने असाच खेळ करत जपानच्या खेळाडूचा पराभव केला.
ब्रिजभूषण यांच्यावर हल्लाबोल
विनेश फोगाटच्या विजयानंतर महावीर फोगाट यांचा ब्रिजभूषण सिंग यांच्यावर हल्लाबोल चढवला. आणि विनेश विजय म्हणजे ब्रिजभूषण यांच्या तोंडावर चापट म्हणत, आमच्या मुलीने जे केले ते ब्रिजभूषण सिंह कधीही करू शकत नाहीत. त्यांनी विनेशचे खूप नुकसान केले आहे. पण जनता विनेशच्या पाठीशी आहे. पुढे ते म्हणाले की, त्यांच्या मुलीने त्यांची स्वप्ने पूर्ण केली. देव विनेशला पुढे घेऊन जावो हाच आशीर्वाद आहे. यावेळी विनेश फोगटकडून संपूर्ण देश सुवर्ण पदकाची अपेक्षा करत आहे.
राहुल गांधींनीही दिला पाठिंबा
विनेशच्या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पोस्ट केले विनेश आणि तिच्या मैत्रिणींचा संघर्ष ज्याने नाकारला, त्याच्या हेतूवर आणि कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, त्या सर्वांची उत्तरे मिळाली आहेत. चॅम्पियन्सची हीच ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुमच्या यशाची प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे. असे म्हणत विनेशचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.