Antim Panghal : पॅरिस ऑलिम्पिकमधून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. विनेश फोगाट नंतर भारताच्या आणखी एका कुस्तीपटूला बाद करण्यात आले आहे. भारतीय कुस्तीपटू अंतीम पंघालची पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आली असून तिला पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिमच्या बहिणीला तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी चुकीचे ॲक्रिडेशन कार्ड वापरून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश करताना पकडल्याने ही कारवाई करण्यात आली.
अंतिमची बहीण निशा पंघाल हिला पॅरिस पोलिसांनी या गुन्ह्यासाठी ताब्यात घेतले होते, परंतु नंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) हस्तक्षेपानंतर चेतावणी देऊन सोडण्यात आले. मात्र, या घटनेनंतर आयओएने त्यांना प्रशिक्षक, भाऊ आणि बहिणीसह पॅरिस सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत पहिल्याच वेळी पराभव झाल्यानंतर पंघाल पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आणि तिचे प्रशिक्षक भगतसिंग आणि विकास हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे गेली. त्यावेळी अंतिम पंघालने तिचे अधिकृत ओळखपत्र तिची लहान बहीण निशाला दिले आणि ऑलिम्पिक व्हिलेजमधून तिचे काही सामान आणण्यास सांगितले. मात्र, तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निशाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणानंतर ऑलिम्पिक संघटने त्यांना देश सोडण्याचे निर्देश दिले.
महिलांच्या ५३ किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या पहिल्या फेरीत अंतिम पंघलला ०-१० असा पराभव स्वीकारावा लागला. अंतिमचा सामना तुर्कियेच्या येनेप येटगिल विरुद्ध होता.