भारताच्या अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोवचा पराभव केला आहे. त्यांनी झेलीमखानचा 11-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता अमन पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत अमन सेहरावतने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत अमन सेहरावतचा सामना जपानच्या रे हिगुचीशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.४५ वाजता होईल. हिगुचीने रिओ 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले आहे.