बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान व किरण हे आता सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार केली आहे. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमिर खान आणि किरण राव यांना बोलावणे धाडले आहे. मात्र हे तुम्हाला वाटले असेल कोणत्यातरी खटल्यासंदर्भात बोलवले असेल. मात्र आमिर खान व किरण राव यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वेगळ्या कारणासाठी बोलावणे धाडले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने प्रशासकीय कार्यालयात सभागृहात किरण राव दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित ‘लापता लेडीज’ चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.
हा उपराक्म सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी चालवल्या जाणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या लैंगिक संवेदनशीलता कार्यक्रमाचा एक भाग आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी बार अँड बेंचला असे सांगितले की, सुप्रीम कोर्टातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्याचा माझा हा उपक्रम आहे. म्हणून लापता लेडीज या चित्रपटाचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. लापता लेडीज या चित्रपटाचे स्क्रीनिंग सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कार्यालयातील आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सरन्यायाधीश व इतर न्यायधीश तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.