मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार असल्याच्या चर्चा समोर आली आहे. अहवालानुसार सणासुदीच्या आधीच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. एटीने दिलेल्या अहवालानुसार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरमहा पैसे वाढवून भेटू शकतात.
ET च्या अहवालानुसार, केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात पुढील वाढ करू शकते. महागाई भत्ता (DA) सोबत, महागाई सवलत (DR) देखील वाढणार आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांना DA चा लाभ मिळतो त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माजी कर्मचाऱ्यांना म्हणजेच निवृत्ती वेतनधारकांना DR चा लाभ दिला जातो.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार महागाई भत्त्यामध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. महागाई भत्त्यातील पहिला बदल हा जानेवारीमध्ये लागू केला जातो तर दुसरा बदल हा जुलैमध्ये लागू केला जातो. परंतु यावर्षी महागाई भत्त्यात एकदाच बदल झाल्याचा दिसून येत आहे तो बदल जानेवारी महिन्यात केला होता. यामुळे सरकार दुसऱ्या महागाई भत्त्याच्या बदलाकडे लक्ष देईल आणि लवकरच याबाबत निर्णय जाहीर करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
याआधीच्या वर्षी सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये चार चार टक्के वाढ केली होती. यानंतर डीए आणि डीआरचा दर 50 टक्क्यांनी वाढला होता. यावेळी सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये तीन तीन टक्के वाढ करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यानंतर डीए आणि डी आरचा दर हा 53 टक्क्यांनी वाढला जाऊ शकतो.
दरम्यान, गेल्यावर्षी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक औद्योगिक कामगारांसाठी 400.90 होता. त्यानुसार गणना केल्यानंतर, DA दर 53.35 टक्के येत आहे. सरकार CPI-IW च्या आधारे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे दर बदल असते. यावरुनच आता सणांच्या आधी महागाई भत्ता वाढवून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारे भेटवस्तूच देणार असल्याचे म्हटले जात आहे.