Nagarjuna Akkineni : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुन सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे, साकाराकडून नागार्जुन यांच्या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार नागार्जुन यांच्या एका बेकायदेशीर कंपनीवर सरकारकडून हातोडा चालवण्यात आला आहे, काय आहे प्रकरण पाहूया…
हैदराबाद डिझास्टर मॅनेजमेंट अँड प्रॉपर्टी प्रोटेक्शन एजन्सीने (हायड्रा) म्हणजेच हायड्राने नागार्जुनच्या कन्व्हेन्शन हॉलवर बुलडोझर चालवला आहे. हायड्रा आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत कन्व्हेन्शन हॉल जमीनदोस्त करण्यात आला.
रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळ बांधण्यात आलेला हा हॉल खरं तर एफटीएल झोन अंतर्गत येतो. अशा स्थितीत हायड्राकडून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळीच अभिनेत्याचे हे सभागृह पाडण्याचे काम सुरू केले होते. सभागृहाच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
सध्या हैदराबादमध्ये जलकुंभ आणि सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. या अंतर्गत हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता देखरेख आणि संरक्षण (HYDRAA) ने तेलगू अभिनेता नागार्जुन यांच्या मालकीचे कन्व्हेन्शन सेंटर पाडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे कन्व्हेन्शन सेंटर 10 एकरात पसरले होते, या कन्व्हेन्शन सेंटरने तममीकुंटा तलावावर अतिक्रमण केले होते. तपासणीत असे आढळून आले की, केंद्राचे क्षेत्रफळ 1.12 एकर तलावाच्या फुल टँक लेव्हल (FTL) मध्ये आहे, तर 2 एकरपेक्षा जास्त क्षेत्र तलावाच्या बफर झोनमध्ये येते. या बेकायदेशीर बांधकामामुळे जमिनीचा वापर आणि पर्यावरणाच्या अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कन्व्हेन्शन सेंटर, मोठ्या विवाहसोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी वापरले जात होते आणि कॉर्पोरेट व्यवस्था आणि कार्यांसाठी देखील त्याचा वापर केला जात होता. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता नागार्जुनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेने हैद्राबादमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इतर बेकायदा बांधकामांवरही सरकार असाच हातोडा चालवणार असल्याचे चित्र दिसत आहे.