Himesh Reshammiya : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते बरे होऊन घरी परततील अशी सर्वांना आशा होती, पण तसे झाले नाही. 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
हिमेश रेशमिया आपल्या वडिलांना आपला गुरु मानत होता. हिमेश वडिलांच्या अगदी जवळ होता. वडिलांच्या निधनानंतर हिमेश रेशमियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया वृद्धापकाळातील समस्या आणि आजारांशी लढत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र, मृत्यूच्या या लढाईत ते हरले आणि जगाला निरोप दिला.
माहितीसाठी, विपिन रेशमियाने हे संगीत विश्वातले मोठे नाव आहे. त्यांनी सलमान खानच्या चित्रपटातही संगीत दिले आहे. यादरम्यान सलमानची हिमेश रेशमियाशी भेट झाली. यानंतर सलमानने हिमेश रेशमियाला त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. यानंतर सलमान आणि हिमेश रेशमिया यांच्यात चांगले नाते निर्माण झाले आणि हिमेशला चित्रपटांमध्ये काम मिळू लागले.