Raj Thackeray : माझ्या पूर्वीच्या पक्षात म्हणजेच वर्ष २००० साली मी ज्या पक्षात होतो. तेव्हा तिकड जे सगळं सुरू होतं त्याला कंटाळून मी रिवर्स गियर टाकला होता. त्यावेळी मला आतून वाटत होतं की आता राजकारणात राहायला नको. त्या क्षेत्रात पुढे काही करायचं नाही, इच्छाच नाही. राजकारणातून हळूहळू बाहरे पडायचं होतं, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्यासोबत झालेल्या अंतर्गत राजकारणाच्या आठवणीला उजाळा दिला.
‘येक नंबर’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘साजिद नाडीयादवाला भेटायचो आणि म्हणायचो आपल्याला चित्रपट निर्मिती सुरु करायची आहे. पण पुन्हा मी राजकारणाकडे वळण्याचं कारण साजिद नाडियादवाला आहे. कारण त्यावेळी साजिद मला म्हणाले की, मी पण एक दिग्दर्शक आहे आणि आम्ही दिग्दर्शक जे काही कामं करतो. ती कामं राज ठाकरेंना करताना मी पाहू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात, तिथे राहा. सिनेमे बनत राहतील. आताही बनवणार आहोत, पुढेही बनवत राहणार आहोत. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो.
पुढे बोलतान राज ठाकरे म्हणाले, ‘आज इतक्या वर्षांनी प्रोडक्शन कंपनी सुरु केली तेजीस्विनी पंडित भेटल्या. रिजिनल फिल्म मोठ्या व्हायला हव्यात आम्हाला पण वाटतंय. अजय अतुल यांना तर म्हणलं की ताक पण कळतं आणि ताडी पण कळतं. अनेकांनी मेहनत घेतली…अजय अतुल यांच्यासोबत अनेक वर्ष काम करतोय. राजेश मापुस्कर यांनी सुरवातीला स्टोरी ऐकवली तेव्हा मी म्हटलं तेव्हा झेपेल ना? फिल्मच्या वेळी अनेक लोकांना त्रास दिला त्यामुळे आजच दिलगिरी व्यक्त करतो. मराठीमधली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर फिल्म ठरुदे, असंही राज ठाकरे म्हणाले. उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत. परंतु ज्याप्रकारे इतर रिजनल फिल्म मोठ्या होताना दिसत आहेत. त्याप्रमाणे मराठी बनवणं देखील गरजेचं आहे. त्यातून येक नंबर चित्रपट उभा राहिला. केदार शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी येक नंबर हे टायटल दिलं. आज अजय-अतुल इथे आहेत. माझे अजय-अतुल अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत, त्यांचेही आभार मानतो. अरविंद जगताप यांनी सिनेमाला दर्जेदार वळण दिलं, असंही राज ठाकरे म्हणाले. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहणे खरच उत्सुकतेचे ठरणार आहे.