KBC 16 : जम्मू-काश्मीरमधील 22 वर्षीय तरुण चंद्र प्रकाशने ‘कौन बनेगा करोडपती (KBC) या शोच्या16 व्या सीजनचा पहिला करोडपती बनून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. चंद्र प्रकाश हा UPSCचा विद्यार्थी आहे. अनेक आरोग्य समस्या असूनही चंद्र प्रकाशने कधीही जिद्द सोडली नाही. आणि आज त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले असून, त्याने 1 कोटी रुपये जिंकले आहेत.
पण 7 कोटींच्या जॅकपॉटच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. शोचे होस्ट आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्याच्या जिद्दीचे कौतुक केले. बुधवारी (25 सप्टेंबर), सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये KBC होस्ट बिग बी चंद्र प्रकाशच्या विजयाची घोषणा करताना दिसले.
चंद्र प्रकाश बद्दल बोलायचे झाले तर, त्याला लहानपणापासूनच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा करावा लागला. असे असतानाही चंद्र प्रकाशने कधीच मेहनत सोडली नाही आणि हॉट सीट पर्यंत येऊन पोहोचला.
https://www.instagram.com/reel/DAWN4hgB0fm/?utm_source=ig_web_copy_link
सोनी टेलिव्हिजनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अमिताभ बच्चन प्रेक्षकांसमोर उभे आहेत आणि आनंदाने “1 कोटी रुपये!” असे ओरडताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांनी चंद्र प्रकाशला मिठी मारत त्याचे अभिनंदन देखील केले.
केबीसीचा 16 वा सीजन 12 ऑगस्टपासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे, त्याचे भाग रात्री 9 वाजता प्रसारित केले जातील. साल 2000 पासून अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत आले आहेत. दरम्यान, अभिनेता शाहरुख खानने 2007 मध्ये फक्त तिसऱ्या सीझनमध्ये हा शो होस्ट केला होता.