कैरेबियन प्रीमियर लीग 2024 (Caribbean Premier League) सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies cricket team) अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. कैरेबियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान त्याच्या कमरेला मोठी दुखापत झाली आहे. यामुळेच त्याने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. ही लीग संपल्यानंतर सीपीएलमधून निवृत्ती घेणार आहे असे त्याने सांगितले आहे. ट्रिनबागो नाइट रायडर्स टीमकडून ड्वेन ब्राव्होने कैरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. या दरम्यान फील्डिंग करताना त्याला कमरेला मोठी दुखापत झाली आहे यामुळेच त्याने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत त्याने सोशल मिडियावर भावुक करणारी पोस्ट देखील लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये खेळाडू ड्वेन ब्राव्होनेने म्हटले आहे की, “ज्या खेळाने मला सर्व काही दिलेले आहे त्या खेळाचा मी आज निरोप घेत आहे. 21 वर्षांचा हा व्यावसायिक क्रिकेटमधील प्रवास अविस्मरणीय आहे. मला पुढे खेळायचे होते परंतु आता शरीर साथ देत नाही आतापर्यंत अनेक चढ उतार आलेले आहेत. मला कोणालाच नाराज करायचे नाही. जड अंतकरणाने मी अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो” अशा शब्दांत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे.
आपल्या टी20 क्रिकेट करियरमध्ये ड्वेन ब्रावो 582 सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने 631 विकेट घेतलेल्या आहेत. 11 वेळा 4 विकेट आणि 2 वेळा 5 विकेट त्याने टी20 क्रिकेटमध्ये घेतलेल्या आहेत. एकूण 6970 धावा देखील त्याने त्याच्या टी20 करियर कालावधीत केलेल्या आहेत. यात 20 हाफ सेंच्युरी देखील आहेत.
दरम्यान, पुढील महिन्यात खेळाडू ड्वेन ब्राव्होने 41 वर्षांचा होणार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2021 सालीच निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएलमध्ये मागच्यावर्षी त्याने कोचिंग देखील केले होते.