भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे सर्वच क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध आहेत. अनेकदा लोकांशी संवाद साधताना ते आयुष्यातील किस्से आणि आलेले अनुभव सांगत असतात. असाच एक किस्सा त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलेला आहे. दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे प्रमुख धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani)देखील आपल्या कामामुळे चकित झाले होते आणि त्यांनी खूष होऊन नितीन गडकरी यांचे कौतुक केले होते. तो प्रसंग नितीन गडकरी यांनी मुंबईमध्ये इंडिया टुडेच्या (India Today)कार्यक्रमात बोलताना सांगितलेला आहे.
मुंबई वरळी उड्डाणपुलासाठी सरकारला निधीची गरज होती. त्यावेळी मी शेअर बाजारातून 1200 कोटी रुपये मिळवले होते. हे पाहून उद्योगपती धीरूभाई अंबानी अतिशय खुश झालेले आणि त्यांनी माझे कौतुक देखील केले होते. तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार आहात अशी कौतुकाची थाप धीरूभाई अंबानी यांनी दिली होती असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
याचसोबत इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना खड्डेमुक्त रस्ते होतील असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलेले आहे. आज ठिकठिकाणी रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. खंडयामुळे अनेक अपघात होतात. पाऊस पडायला लागला की रस्त्यांना जास्त खड्डे पडतात. रस्त्यात खड्डे होऊ नये ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत यासाठी आम्ही एक नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहोत असे देखील नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, 10 वर्षात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. 60 वर्षात जो विकासाचा पल्ला आपल्याला गाठता आला नाही तो 10 वर्षात गाठला आहे. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होईल असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.