सध्या इस्रायल(Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे लेबनॉनच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी रॉकेट, मिसाइल्स आणि मोठ्या प्रमाणात बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर(Lebanon) एका पाठोपाठ एक हल्ले केले जात आहेत. इस्रायलने हिजबुल्लाच्या मुख्यालयावर काल रात्री क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 90 जण जखमी आहेत अशी माहिती मिळालेली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात हिसबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह (Hassan Nasrallah) देखील मारला गेल्याचे वृत्त समोर आले आहे.
IDF ने याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यात हिसबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला आहे. याचसोबत नसरल्लाह सोबतच हिजबुल्लाचे इतर कमांडर्सना देखील ठार करण्यात आले आहे. नसरल्लाहला घाबरण्याची आता गरज नाही. तो दहशत पसरवू शकणार नाही. असे देखील आयडीएफने म्हटले आहे. याचसोबत त्यांची मुलगी जैनबच्या मृत्यूचा दावा देखील इस्रायलकडून करण्यात आला आहे. परंतु हिजबुल्लाकडून हसन नसरल्लाह मारला गेल्याच्या घटनेला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, या घटनेनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली आहे. याचसोबत इस्त्रायली हल्ल्याचा निषेध करत हे युद्ध गुन्हा असल्याचे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणालेले आहेत.