अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. आरएसएसने राजे यांना या पदासाठी सर्वोत्तम मानले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याबरोबर संजय जोशी (Sanjay Joshi)आणि शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची नावेही चर्चेत आहेत, परंतु आरएसएसने (Rashtriya Swayamsevak Sangh) वसुंधरा राजे यांचे नाव पुढे आणले आहे.
भाजपच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निर्णय घेण्याची परंपरा आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पक्षाच्या हायकमांडने राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची तयारी दाखवलेली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
वसुंधरा राजे यांचे आरएसएसशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांना या पदासाठी अधिक प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी वसुंधरा राजे यांचे काही मतभेद असल्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात असे देखील म्हटले जात आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवले जात असताना, पक्षाने त्याऐवजी अन्य नेत्यांना पुढे आणले होते.
राजे यांनी नुकतेच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रभावी भाषण दिलेले आहे, ज्यात त्यांनी राजकारणातील चढ-उतारांचा उल्लेख केला आहे. आता वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अध्यक्षपदाचा निर्णय काय येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
जर वसुंधरा राजे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या, तर भाजपच्या धोरणांना एक नवीन दिशा मिळू शकते अशा चर्चा होत आहेत. मात्र, त्यांच्या आणि पक्षाच्या हायकमांडच्या संबंधांमध्ये कोणतीही बिघाड झाल्यास त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो अशा चर्चा होत आहेत.