आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elections 2024 ) आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Athawale Ramdas) यांनी नुकतीच भाजपकडे 12 जागांची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांना पत्र लिहिलेले आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक 288 जागांसाठी होणार आहे.
मुंबईमधील काही जागांवर आठवले यांचा पक्ष आरपीआयने देखील पत्र लिहून दावा केलेला आहे. मानखुर्द शिवाजीनगर, मालाड आणि धारावीच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. याच 10 ते 12 जागांवर आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी असे वक्तव्य रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. विदर्भात 3 ते 4 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी देखील आरपीआय करणार आहे ही माहिती समोर आलेली आहे.
मुंबईमधून विधानसभेच्या 36 जागा असून भाजप गेल्या दोन निवडणुकांपासून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडून आलेला आहे. रामदास आठवले पत्रकार परिषदेत बोलताना म्हणालेले आहेत की, गेल्या निवडणुकीत इच्छा असून देखील निवडणूक लढलो नाही. जागा न घेता प्रचार केला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत यासाठी आम्ही मागणी देखील केलेली आहे.
यापुढे बोलताना ते म्हणाले आहेत की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही कोल्हापूर, धारावी, मालाड, वाशिम, नांदेड या सारख्या जागांची मागणी केली आहे. विधान परिषद अमदारांमध्ये 12 पैकी 1 जागा आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दरम्यान, मालाड पश्चिम जागांवर मागील तीन निवडणुकांपासून काँग्रेसचे वर्चस्व राहीलेले आहे. 2004 पासून ही जागा कॉँग्रेसकडे आहे. गेल्या १५ वर्षांपासून अस्लम शेख याठिकाणी आमदार असून आता त्यांच्या विरोधातील भाजपची जागा भाजप आरपीआयला देणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.