जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Elections 2024 ) आज शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहेत. आज शेवटच्या टप्प्यात 40 जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण 415 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जम्मू काश्मीरमधील जम्मू, उधमपूर, सांबा, कठुआ, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा या 7 जिल्ह्यांमध्ये आज मतदान होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान करण्यात आलेले आहे.
यामध्ये बांदीपूर जिल्ह्यात 11.64 टक्के मतदान झालेले आहे. जम्मू जिल्ह्यात 11.46 टक्के मतदान करण्यात आलेले आहे. बारामुल्ला जिल्ह्यात ८.८९ टक्के मतदान झाले असून कठुआ जिल्ह्यात १३.०९ टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच सांबा जिल्ह्यात १३.३१ टक्के मतदान झाले आहे. कुपवाडा जिल्ह्यात 11.27 टक्के मतदान करण्यात आले आहे तर उधमपूर जिल्ह्यात 14.23 टक्के मतदान झाले आहे. अशाप्रकारे आज सकाळी 9 वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान जम्मू काश्मीरमध्ये झाले असल्याची माहिती मिळालेली आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट केलेले आहे. मी सर्व मतदारांना विनंती करतो की लोकशाहीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व लोकांनी पुढे येऊन मतदान करावे. आज जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील मतदानाची शेवटची फेरी आहे. तसेच मला विश्वास आहे की, अनेक तरुण पहिल्यांदाच मतदान करत आहेत यामध्ये महिला मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होणार आहेत. ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणालेले आहेत.
दरम्यान, आज जम्मू काश्मीरमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून याचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच आता शेवटच्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी किती टक्के मतदान होणार आणि या विधानसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.