इस्रायल(Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या गंभीर संघर्षामुळे लेबनॉनच्या (Lebanon) सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणात रॉकेट, मिसाइल्स आणि बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर(Lebanon) एका पाठोपाठ एक हल्ले केले जात आहेत. इराणने इस्रायलवर हल्ला केल्याने इस्रायल तीन ठिकाणाहून युद्ध लढवत आहे. काही वर्षांपूर्वी इस्रायलला एका लढाईमध्ये भारताच्या मदतीने एक शहर मिळवता आले होते. सध्या या शहरावर इस्रायलची आर्थिक ताकद अवलंबून आहे. या शहराचे नाव हाईफा असे आहे. हे शहर आज एक बंदर म्हणून नावारूपाला आले आहे. इस्रायल वर्ल्ड ट्रेडमध्ये हाईफा या शहरामुळे महत्वाची भूमिका बजावत आहे.
हे शहर पुढील काळात इकॉनॉमिक कॉरीडॉरचा भाग बनणार असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया मिडल ईस्ट इरोपचा हायफा शहर एक टप्पा बनणार आहे. भारतात झालेल्या जी 20 बैठकीत याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.हाईफा शहराच्या मुख्य पोर्टमध्ये 10 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक भारतातील उद्योगपती गौतम अदाणी यांनी केली आहे.
हाईफा या बंदराची वार्षिक 3 कोटीहून अधिक उलाढाल होते. इस्रायलमध्ये कार्गोने जेवढा व्यवहार होतो यातील तीन टक्के व्यवहार एकट्या हायफामधून होत असल्याचे सांगण्यात आले आहे. हाईफा हे शहर शस्रास्त्रे निर्यात करायला देखील मदत करते. कंप्यूटर एंड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून देखील हायफा शहराला ओळखले जाते. 11 टक्यांपेक्षा जास्त योगदान या उद्योगाचे हाईफा शहराच्या अर्थव्यवस्थेत आहे.
दरम्यान, 23 सप्टेंबर 1918 रोजी हाईफा हे शहर अस्तित्वात आले होते. पहिल्या महायुदधावेळी हे शहर स्वतंत्र झाले होते. हाईफा शहरावरील ऑटोमन साम्राज्याचा अंत होऊन त्याठिकाणी ब्रिटीशांचा झेंडा फडकला होता परंतु नंतर ते शहर इस्रायलला मिळाले.बॅटल ऑफ हायफाच्या लढाईचे नाव भारतीय सैनिकांनी इतिहासात नोंदविले आहे. हाईफाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या सैनिकांमध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त सैनिक जोधपुर, हैदराबाद, पटियाला आणि म्हैसूर तसेच काश्मीर आणि काठीयावाड येथील होते.