कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy)यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ५० हजार कोटी लाच मागितली.तसेच जीवे मारण्याची देखील धमकी दिली असा आरोप जेडीएसचे सोशल मीडिया उपाध्यक्ष विजय टाटा यांनी कुमार स्वामी आणि रमेश गौडा (Ramesh Gowda) यांच्यावर केले आहेत. या प्रकरणी विजय टाटा यांनी कुमार स्वामी आणि रमेश गौडा यांच्याविरोधी अमृतहल्ली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे.
विजय टाटा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, रमेश गौडा हे माझ्या घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुमार स्वामी यांना फोन लावला. त्या दोघांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे ५० कोटींची मागणी चन्नापटणा निवडणुकीसाठी केली. जर पैशांची व्यवस्था झाली नाही तर बेंगळुरूमध्ये राहणे कठीण होईल. याचसोबत रिअल इस्टेटचा व्यवसाय चालवणे देखील कठीण होईल अशी धमकी रमेश गौडा यांनी दिली असा आरोप विजय टाटा यांनी केला आहे.
दरम्यान, जेडीएस पक्षाने विजय टाटा यांचा जेडीएस पक्षाशी कोणत्याच प्रकारचा संबंध नाही असे म्हटले आहे आणि कुमारस्वामी यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत. कर्नाटकचा मुख्यमंत्री होण्यासाठी १००० कोटी रुपये एका नेत्याने बाजूला ठेवले असा आरोप कुमारस्वामी यांनी केला होता. त्यांच्या या विधानाविरोधात कॉँग्रेससकडून एफआरआय देखील दाखल करण्यात आला होता. बसनगौडा पाटील यत्नल यांच्या विरोधात हे वक्तव्य केले असून आता पोलिसांनी कुमारस्वामी यांच्यावर एफआरआय दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, कुमारस्वामी यांच्यावर उद्योग आणि पोलाद मंत्रालयाची जबाबदारी असून ते दोनदा कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.