विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर १० वर्षांनी निवडणूक घेण्यात येत आहे. विधानसभेच्या एकूण 90 जागा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आहेत. हरियाणात दोन कोटींपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हरियाणात एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सर्व पक्ष या निवडणूकीची जोरदार तयारी करत आहेत. ३ ऑक्टोबरपासून कोणत्याच पक्षाला प्रचार करता येणार नाही असे सांगण्यात आले होते. त्यानुसार कालपासून सर्व पक्षांचा प्रचार संपला आहे.
उद्या (5 ऑक्टोबर ) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 20,629 मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.हरियाणामध्ये भाजप, काँग्रेस, आप, INLD-BSP आणि JJP-आझाद समाज पक्ष यांनी जोरदार प्रचार केला आहे. काल 6 वाजता निवडणूक प्रचार संपण्याच्या आधी सर्व पक्षांनी मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी निवडणूकीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचारासाठी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ नंतर परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. यादरम्यान प्रचार करताना अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. आरक्षण, भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि घराणेशाहीच्या राजकारणावर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे असे देखील पंकज अग्रवाल यांनी सांगितले आहे. भाजपचे योगी आदित्यनाथ आणि नायब सिंग सैनी, काँग्रेसचे राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंग हुडा, जेजेपीचे दुष्यंत चौटाला आणि आयएनएलडीचे अभय सिंह चौटाला तसेच अनेक प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केलेला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना संबोधित केले आहे.