कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला (Kautilya Economic Conclave) संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे. भारताला दरडोई उत्पन्न $2730 गाठण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे लागली आहेत. आता $2000 ची वाढ पुढील ५ वर्षांत दरडोई उत्पन्नात होईल असे भाष्य त्यांनी केले आहे. याचसोबत येत्या काही दशकांत सामान्य माणसाची जीवनशैली देखील बदलेल असे अर्थमंत्री म्हणालया आहेत.
5 वर्षात जगातील 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेत आर्थिक आघाडीवर भारताने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सातत्याने उच्च विकास दर आणि कमी महागाई ठेवल्यामुळे हे शक्य झाले आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधान केले आहे. संपूर्ण जग हे विभागले गेलेले आहे आणि सतत काही ना काही संघर्ष होताना दिसून येत आहे. यामुळे जागतिक शांततेसाठी याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील भारताच्या 140 कोटी लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्न एकूण 18 टक्के आहे असे त्या पुढे बोलताना म्हणालेल्या आहेत.
जागतिक परिस्थिती पूर्वीसारखी नाही. चीनसारख्या उदयोन्मुख बाजारपेठा 2000 च्या दशकात, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण अनुकूल असल्यामुळे वेगाने वाढलया. परंतु भारतासाठी हे मोठे आव्हान असले तरीदेखील पुढील दशकात भारताचा वेगाने विकास होत राहील असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, 43 टक्के भारतीय 24 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि त्यांना त्यांच्या उपभोगाच्या पद्धतींचा शोध घेणे बाकी आहे. यामुळेच येत्या काळात भारतात वेगवेगळ्या गोष्टींच्या खपामध्ये जोरदार वाढ होईल असे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हलमध्ये बोलताना म्हणाल्या आहेत.